भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा दुसरा सामना बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 2 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात अफगाणिस्तान संघात कोणताही बदल नाहीये. अफगाणिस्तान आपल्या पहिल्या सामन्यातील स्क्वॉडसोबतच या सामन्यात उतरणार आहे. दुसरीकडे, भारतीय संघात एक बदल झाला आहे. आर अश्विन संघातून बाहेर पडला असून त्याच्या जागी शार्दुल ठाकूर याला सामील करण्यात आले आहे.
स्पर्धेतील कामगिरी
भारत आणि अफगाणिस्तान संघाची स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर भारतीय संघापुढे पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. हा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला होता. सध्या भारत गुणतालिकेत एका विजयानंतर 2 गुण मिळवत चौथ्या स्थानी आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाविषयी बोलायचं झालं, तर त्यांचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. या सामन्यात अफगाणिस्तानला 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. अफगाणिस्तान संघ एका पराभवानंतर सध्या नवव्या स्थानी आहे.
आमने-सामने कामगिरी
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) संघात आतापर्यंत फक्त 3 वनडे सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने दोन वेळा विजय मिळवला आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला होता. आता पुन्हा एकदा हे संघ एकमेकांविरुद्ध उतरणार आहेत. (Afghanistan have won the toss and have opted to bat against india cwc23)
स्पर्धेच्या नवव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह ओमरजाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी
हेही वाचा-
सचिनने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकलं असतं, तर भारत हरला असता! सेहवागचा 2011 वर्ल्डकपविषयी मोठा खुलासा
दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘आज खूप काही गमावलं, आता…’