भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात दमदार केली आहे. त्यांनी पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. आता संघ बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. यावेळी भारतीय संघ 12 वर्षांचा वनडे चॅम्पियन बनण्याचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करेल. अशात, भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवाग याने विश्वचषक 2011मधील पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य सामन्यातील मजेशीर किस्स्याचा खुलासा केला आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यावेळी सांगितले आहे की, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्यासोबत त्याची नेमकी काय चर्चा झाली होती. खरं तर, विश्वचषक 2011 (World Cup 2011) स्पर्धेतील उपांत्य सामन्यात सचिन भारतीय संघाचासर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. तो 85 धावा करून तंबूत परतला होता. त्यावेळी सेहवाग डगआऊटमध्ये बसला होता. तो सचिनला पाहून हसला आणि सचिनही त्याच्याकडे पाहून हसलेला.
सचिन आणि सेहवागची चर्चा
सेहवाग म्हणाला, “सचिन मला म्हणाला की, ‘मला माहिती आहे की, तू का हसत आहे.’ मी का असे विचारले, तेव्हा तो म्हणाला, ‘तू हा विचार करत आहे की, बरं झालं मी शतक करण्यापूर्वी आऊट झालो. जर मी शतक केले असते, तर आपण हारू शकलो असतो.’ मी म्हणालो, तुम्ही माझ्या मनातील गोष्ट कशी काय ओळखली? तुम्ही दोन शतके झळकावली, एकात आपण हारलो आणि एक सामना अनिर्णित राहिला. देवाची कृपा आहे की, तुम्ही शतक केले नाही आणि आपण विश्वचषक जिंकण्यात यशस्वी झालो.”
भारत बनला विश्वविजेता
खरं तर, उपांत्य सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर 2 एप्रिल 2011 रोजी अंतिम सामन्यात श्रीलंका संघाचा पराभव करत किताब जिंकला. भारताने वनडे क्रिकेटमध्ये 28 वर्षांचा दुष्काळ संपवत दुसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचा मान मिळवला होता. सचिनने आपल्या सहाव्या विश्वचषकात पहिल्यांदाच चॅम्पियन बनत ट्रॉफी हातात घेतली होती. (former cricketer virender sehwag reveals the chat with sachin tendulkar after he was getting out of 85 runs against pakistan in 2011 world cup read here)
हेही वाचा-
दारुण पराभवानंतर श्रीलंकेच्या कर्णधाराचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘आज खूप काही गमावलं, आता…’
PAKvsSL सामन्यानंतर Points Tableमध्ये मोठा उलटफेर; विजयानंतरही पाकिस्तान ‘या’ स्थानी, तर भारत…