सध्या देशभरात विविध शहरांमध्ये रणजी ट्रॉफी 2022-2023 या सर्वात मोठ्या प्रथमश्रेणी स्पर्धेचा हंगाम खेळला जातो. शुक्रवारी ( 20 जानेवारी) एलिट बी गटातील मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियम येथे संपन्न झाला. यामध्ये दिल्ली संघाने आठ गड्यांनी विजय मिळवत स्पर्धेतील पहिला विजय आपल्या नावे केला. यासह मुंबईवर त्यांनी मिळवलेला 41 वर्षातील हा पहिला विजय ठरला.
After restricting Mumbai to 170 in the second innings courtesy of Divij Mehra's superb 5️⃣-wicket haul, Delhi chased down the target and won by 8 wickets on Day 4 👏👏#RanjiTrophy | #DELvMUM | @mastercardindia
Take a look at how the action unfolded 🎥https://t.co/uz6FgbC5wQ pic.twitter.com/o3A8BvkhLG
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 20, 2023
संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरी करत आलेल्या दिल्ली संघाने या सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवला. त्यांनी मुंबई संघासमोर मोठे आव्हान उभे केले. पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे व सर्फराज खान असे प्रतिथयश फलंदाज असताना त्यांनी मुंबईचा पहिला डाव केवळ 293 धावांवर रोखला. मुंबईसाठी सर्फराजने सर्वाधिक 125 धावांची खेळी केली. दिल्लीची देखील पहिल्या डावात सुरुवात खराब झाली. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर युवा वैभव रावल व कर्णधार हिम्मत सिंग यांनी भागीदारी करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. वैभवने 114 धावांची तर हिम्मतने 85 धावांची खेळी केली. या दोघांमुळे दिल्लीने 76 धावांची आघाडी घेत 369 धावा उभ्या केल्या.
दुसऱ्या डावात मात्र मुंबईच्या फलंदाजांनी कच खाल्ली. पृथ्वी व सर्फराज या डावात अपयशी ठरले. कर्णधार अजिंक्य रहाणे व तनुषकोटी यांनी अर्धशतके साजरी करत संघाला 170 पर्यंत मजल मारून दिली. दिल्लीसाठी युवा गोलंदाज दिवीज मेहरा याने सर्वाधिक पाच बळी टिपले. विजयासाठी मिळालेले 94 भावांचे आव्हान पार करताना दिल्लीने कोणताही आक्रमकपणा दाखवला नाही. त्यांनी आपल्या दोन्ही सलामीवीरांना गमावत हे लक्ष पूर्ण केले. यावर्षी दिल्लीचा हा स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला.
दिल्ली संघाने मुंबईविरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत 41 वर्षानंतर विजय मिळवण्याची कामगिरी केली. 1979-1980 या हंगामात अंतिम सामन्यात बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने मुंबईला हरवत विजेतेपद आपल्या नावे केले होते.
(Delhi have defeated Mumbai for the first time in 42 years in Ranji Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पंत फक्त उपस्थित असला तरी…’, दिल्लीच्या प्रशिक्षकांकडून दुखापतग्रस्त यष्टीरक्षकाला मैदानात आमंत्रण
आयपीएल क्रश काव्या मारनची जादू दक्षिण आफ्रिकेतही चालली, लाईव्ह सामन्यात आली लग्नासाठी मागणी