आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) मध्ये यापूर्वी खेळलेल्या एका खेळाडूला दिल्ली पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी विकास टोकस (vikas tokas) नावाच्या या खेळाडूला २६ जानेवारी दिवशी गंभीर स्वरूपात मारहाण केल्याची ही घटना आहे. खेळाडूने यासंदर्भात तक्रार देखील दाखल केली आहे. विकास यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वातील आरसीबी संघात २०१६ मध्ये सहभागी होता. तक्रारीत त्याने असे नमूद केले आहे की, या मारहाणीत त्याचा डोळा फुटला असता, पण सुदैवाने तो बचावला आहे.
विकासने दिल्लीतील भिकाजी कामा पोलीस स्टेशनच्या इंचार्ज विरोधात ही तक्रार केली आहे. तक्ररीत त्याने पोलीस अधिकाऱ्याकडून गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचे सांगितले आहे. पोलीस अधिकाऱ्याने विकासच्या चेहऱ्यावर एक जोरदार बुक्की मारली आहे, ज्यामध्ये त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
व्हिडिओ पाहा- द्रविडने लॉर्ड्सवर प्रसाद बरोबर लावलेली पैज १५ वर्षांनी केली पूर्ण
मेल करून केली तक्रार
विकासने दिल्ली पोलीसांना मेल करत तक्रार केली की, “हा मेल मी त्या घटनेची तक्रार करण्यासाठी करत आहे, जी माझ्यासोबत २६ जानेवारीला घडली. मी एक राष्ट्रीय पातळीचा खेळाडू आहे आणि आयपीएलमध्येही खेळतो. २६ जानेवारी २०२२ ला माझ्यासोबत पोलीस अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केले, जे निंदनीय आहे. एका अधिकाऱ्याने मला धक्काबुक्कीही केली, ज्यामध्ये सुदैवाने माझा डोळा जाता-जाता वाचला. मी निवेदन करत आहे की, या घटनेकडे लवकरात लवकर पाहावे, कारण या घटनेनंतर मी खूप मानसिक त्रासातून जात आहे.”
जाणून घ्या विकासची कारकीर्द
दरम्यान, विकासने आतापर्यंत १५ प्रथम श्रेणी आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत, पण यामध्ये त्याचे प्रदर्शन अपेक्षित राहिलेले नाही. आयपीएलमध्ये तो आरसीबीमध्ये सहभागी होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१६ हंगामानंतर त्याला एकदाही कोणत्या आयपीएल फ्रेंचायझीने विकत घेतले नाही. पुढच्या हंगामाच्या मेगा लिलावात देखील त्याच्यावर बोली लागण्याची खूपच कमी शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –
विंडीज दौऱ्यापूर्वी १ फेब्रुवारीला भारतीय संघ अहमदाबादमध्ये जमणार एकत्र, ‘असे’ असेल पुढील नियोजन
आयपीएलसाठी नावनोंदणी केलेल्या भूतानच्या ‘त्या’ एकमेव खेळाडूचे भारताशी आहे घट्ट नाते; घ्या जाणून
व्हिडिओ पाहा –