---Advertisement---

समाजाला महत्त्वपुर्ण संदेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वापरलं पुजाराचं उदाहरण, ट्विट व्हायरल

On: गुरूवार, जानेवारी 21, 2021 11:50 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर मंगळवारी (१९ जानेवारी) चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून विजय खेचला. ३ विकेट्सने हा निर्णायक सामना जिंकत भारताने २-१ च्या फरकाने कसोटी मालिका खिशात घातली. या सामन्यादरम्यान कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने महत्त्वाचे योगदान दिले. यानंतर पुजाराचा फोटो ट्विट करत दिल्ली पोलिसांनी समाजाला मोलाचा संदेश दिला आहे.

ब्रिस्बेन कसोटीत पुजाराने पहिल्या डावात ९४ चेंडूंमध्ये २ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या होत्या. तर पुढील दुसऱ्या डावात २११ चेंडूंचा सामना करत ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली होती. परंतु टिकून फलंदाजी करत संघासाठी अधिकाधिक धावा जोडण्याच्या उद्देशाने सामन्यादरम्यान पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे बरेच बाउंसर सोडावे लागले. याच उदाहरणाचा वापर दिल्ली पोलिसांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रांचने पुजाराचा ब्रिस्बेन कसोटीतील बाउंसर सोडतानाचा एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे. त्यावर कॅप्शन देत त्यांनी लिहिले आहे की, ‘हे लक्षात ठेवा…’ या फोटोवर, ‘जसे तुम्ही प्रत्येक बाउंसर हिट करू शकत नाही. तसेच तुम्ही प्रत्येक लिंकवर क्लिक करायचे नाही’, असे लिहिले आहे.

अशाप्रकारे अप्रत्यक्षपणे दिल्ली पोलिसांनी समाजाला मोठा संदेश दिला आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बऱ्याच जणांनी अतिशय महत्त्वपुर्ण संदेश देण्यासाठी दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहे.

https://twitter.com/shariqjoy85/status/1351732249058701312?s=20

https://twitter.com/lion_vaibhav/status/1351546068987736065?s=20

असा झाला थरारक ब्रिस्बेन कसोटी सामना

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकून (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते.

प्रत्युत्तरात भारताकडून शुबमन गिलने सर्वाधिक ९१ धावांची खेळी केली. तसेच रिषभ पंतने ८९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला वॉशिंग्टन सुंदरने २२ धावा करत चांगली साथ दिली. तर चेतेश्वर पुजाराने भक्कम बचावात्मक खेळी करताना ५६ धावा केल्या. त्यामुळे भारताला हे आव्हान पार करता आले आहे.

ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स आणि जोश हेजलवूडने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणूनच पाकिस्तानचे खेळाडू भारतीय खेळाडूंप्रमाणे यशस्वी होत नाही, दिग्गजाचे मोठे भाष्य

“शेवटी आई-वडील हे..” ब्रिस्बेन कसोटीतील गिलचे शतक हुकल्याने वडील नाराज, विरूने दिली प्रतिक्रिया

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---