महिला प्रीमियर लीगमधील दुसरा सामना आज (15 फेब्रुवारी) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात खेळला गेला. या अटीतटीच्या लढतीत मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्लीने 2 विकेट्सने शानदार विजय मिळवला.
हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली. मुंबईकडून नॅट सायव्हर ब्रंटने नाबाद (80 धावा) केल्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने (42) धावांचे योगदान देऊन मुंबईला 164 धावांपर्यंत पोहोचवले. धावांच्या बाबतीत मुंबईच्या 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दिल्लीकडून अॅना सदरलँडने सर्वाधिक 3 आणि शिखा पांडेनेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची सुरुवात खूप चांगली झाली. कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी पॉवर प्लेमध्येच संघाची धावसंख्या 60च्या पुढे नेली. लॅनिंग 15 धावा काढून बाद झाली, तर शफालीने 18 चेंडूत 7 चौकारांसह 2 षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. मधल्या षटकांमध्ये दिल्ली विजयापासून दूर जात असल्याचे दिसत होते पण निक्की प्रसादने 35 धावांची संथ पण महत्त्वाची खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या षटकांमध्ये धावबाद होण्यासाठी अनेक अपील झाले, पण अखेरिस दिल्लीने विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
पुलवामा शहीदाच्या मुलाची U-19 संघात निवड; देशाला अभिमान
एमएमसी, सिंहगड कॉलेजचे विजय
हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम..! अशी कामगिरी करणारी दुसरीच महिला खेळाडू