---Advertisement---

दिल्ली-गुजरातच्या सामन्यात 4 रेकॉर्ड्स मोडले जाण्याची शक्यता! गिल-राहुलकडून मोठी कामगिरी अपेक्षित

On: रविवार, मे 18, 2025 5:01 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील डबल हेडर मधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात संध्याकाळी खेळला जाणार आहे. हा हंगामातील 60 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात के एल राहुल, शुबमन गिल सहित 4 खेळाडू वेगवेगळे रेकॉर्ड्स मोडू शकतात.

जर आजचा सामना दिल्लीने जिंकला तर दिल्ली टॉप 4 संघात स्थान निर्माण करेल. त्यानंतर त्यांना येणारे 2 सामने जिंकावे लागतील. तसेच गुजरातने विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा तो या हंगामातील पहिला संघ ठरेल. जर दिल्लीने हा सामना गमावला, तर पुढचे दोन्ही सामने त्यांना जिंकावेच लागतील तसेच प्लेऑफसाठी अन्य संघांच्या निर्णयावर निर्भर रहावे लागेल.

गुजरातचा कर्णधार शुबमन गिलकडे टी20 करिअरमध्ये एक खास रेकॉर्ड बनवण्याची संधी आहे. गिलने 156 सामन्यात 153 डावात 4979 धावा केल्या आहेत. तो त्याच्या टी20 करिअरमध्ये 5000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 21 धावा दूर आहे. जर आज त्याने हा आकडा पार केला, तर तो सगळ्यात वेगाने 5000 टी20 धावा पूर्ण करणारा दुसरा भारतीय बनू शकतो. या यादीत पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे. विराटने 167 डावात हा आकडा पार केला होता. पहिल्या स्थानावर केल राहुल आहे ज्याने 143 डावात 5 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

विराट कोहली सध्या टी20 मध्ये सर्वात वेगाने 8 हजार धावा पूर्ण करणारा भारतीय आहे. पण सध्या के एल राहुल हा विक्रम मोडण्याच्या खूप जवळ पोहोचला आहे. राहुलला फक्त 33 धावांची गरज आहे. विराटने 143 डावांमध्ये 8 हजार धावा केल्या होत्या.

गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज या हंगामात शानदार फॉर्ममध्ये खेळत आहे. साई सुदर्शनच्या नावावर आयपीएल स्पर्धेत 47 षटकार आहेत. तो 3 षटकार झळकावून या संघासाठी 50 षटकार पूर्ण करू शकतो. साई सुदर्शन आयपीएलमध्ये फक्त या संघासाठी खेळला आहे. या संघाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या 11 डावांमध्ये 509 धावा केल्या आहेत. तो ऑरेंज कॅप होल्डर सूर्यकुमार यादव पर्यंत पोहोचण्यासाठी एक धाव दूर आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा गोलंदाज कुलदीप यादवच्या नावावर सुद्धा एक शानदार रेकॉर्ड होऊ शकतो. कुलदीपच्या नावावर आयपीएलमध्ये तो त्याच्या विकेटच्या शतकापासून 1 विकेट दूर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---