---Advertisement---

DC vs RCB : दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेत बंगळुरूला दिले फलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 24 वा सामना आज (10 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे खेळवला जात आहे. बंगळुरू हा संघ रजत पाटीदार व दिल्ली कॅपिटल संघ अक्षर पटेल याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व बंगळुरूला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.

बेंगळुरूने आता पर्यंत 4 सामने खेळले व त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दिल्लीने आत्तापर्यंत 3 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा , टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल

दिल्ली कॅपिटल्स : फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---