वडोदरा। महाराष्ट्रच्या टेबल टेनिस खेळाडू विधी शाहने आपल्याच राज्याच्या समृद्धी कुलकर्णीचा युटीटी 65 वी राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या 19 वर्षाखालील गटाच्या उपांत्यफेरीत 9-11, 12-10, 11-7, 11-4 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
ही स्पर्धा स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसजीएफआय) यांच्या मान्यतेखाली वडोदराच्या समा इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम येथे सुरु आहे.
पहिल्या सेटमध्ये पराभव होऊन देखील विधीने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट आपल्या नावे केला. यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी न देता विजय मिळवला.
विधीचा सामना दिल्लीच्या तिशा कोहलीशी होणार आहे. तिने महाराष्ट्रच्या तेजल कांबळेला अन्य उपांत्यसामन्यात 9-11, 8-11, 11-7, 13-11, 11-4 असे नमविले.
दरम्यान मुलांच्या 17 वर्षाखालील एकेरीच्या उपांत्य फेरीत राष्ट्रीय चॅम्पियन पायस जैनने सीआयएससीईच्या राजवीर शाहला एकतर्फी झालेल्या सामन्यात 11-7, 11-3, 12-10 असे पराभूत केले.
पायसचा सामना पश्चिम बंगालच्या अनिकेत सेन चौधरीशी होणार आहे. अनिकेतने अव्वल मानांकित दिल्लीच्या यशांश मलिकचा अन्य उपांत्य सामन्यात 11-6, 11-6, 11-8 असा पराभव केला. ही स्पर्धा युटीटी व टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा (टीटीएबी) यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.
स्पर्धेला स्पोर्ट्स अॅथोरिटी ऑफ गुजरात(एसएजी), गुजरात राज्य टेबल टेनिस असोसिएशन(जीएसटीटीए) व वडोदरा महानगर सेवा सदन (विएमएसएस) यांचा पाठींबा आहे. आयओसीएल, ओएनजीसी, गेल आणि जीएसीएल याचे प्रायोजक आहेत.