---Advertisement---

दिल्ली vs लखनऊ : कोण फोडणार विजयाचा नारळ? जाणून घ्या आकडेवारी

---Advertisement---

आज आयपीएल 2025 स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टनम मध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7.30 सुरू होईल. दोन्ही संघांचे नेतृत्व यावेळी नवीन कर्णधार करणार आहेत. एका बाजूला लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत असणार आहे, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सुद्धा आहे. तसेच दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व अक्षर पटेल करणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये आत्तापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 3 वेळा लखनऊ तर 2 वेळा दिल्लीने बाजी मारली आहे. मागच्या हंगामात आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांमध्ये 2 सामने खेळण्यात आले होते आणि दोन्ही सामन्यात दिल्लीने लखनऊ वर विजय मिळवला होता. दिल्ली कॅपिटल्स बद्दल बोलायचे झाल्यास, त्यांची लखनऊ विरुद्ध सर्वाधिक धावसंख्या 208 धावा आहेत. तसेच लखनऊ संघाची दिल्ली विरुद्ध धावसंख्या 195 धावा आहे.

विशाखापट्टनम मधील वाय.एस राजाशेखर स्टेडियम बद्दल बोलायचे झाल्यास, येथे आतापर्यंत 15 आयपीएल सामने खेळण्यात आले आहेत, ज्यामध्ये 8 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ तर 7 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी झाला आहे. या मैदानावर सर्वात मोठी धावसंख्या करणारा संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे, ज्याने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 272 धावा केल्या होत्या.

ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे की, विशाखापट्टनम मध्ये यशस्वीपणे केलेली सर्वात मोठी धावसंख्या फक्त 142 धावा आहे. त्यामुळे जर आज प्रथम फलंदाजी करणारा संघ जर मोठी धावसंख्या उभी करू शकला, तर विरोधी संघाला धावांचा पाठलाग करणे खूप अवघड जाऊ शकते.

दिल्ली कॅपिटल्स संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : जेक फ्रेजर-मैकगर्क, फाफ डु प्लेसिस, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिजवी, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, टी. नटराजन

लखनऊ सुपर जायंट्स संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: अर्शिन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, डेविड मिलर, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, रवि बिश्नोई, शमर जोसेफ, अवेश खान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---