यशश्वी जयस्वाल याने इंग्लंडविरुद्ध मायदेशातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. भारताने या मालिकेत 4-1 अशा फरकाने बाजी मारली. जयस्वालसह इतर भारतीय खेळाडूंनी देखील या सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले. पण यशस्वी जयस्वालसाठी ही मालिका खऱ्या अर्थाने खास ठरली. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर जयस्वालने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करावे, अशी इच्छा भारताच्या माजी दिग्गजाने व्यक्त केली.
यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. इग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने 89च्या सरासरीने 712 धावा कुटल्या. यात सलग दोन सामन्यांमध्ये जयस्वालने द्विशतके ठोकली. जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटला सुरुवात केली होती. आतापर्यंत खेळलेल्या 9 कसोटी सामन्यांमध्ये जयस्वालने 68.53च्या सरासरीने 1028 धावा केल्या आहेत. त्याचसोबत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जयस्वालच्या नावावर 502 धावांची नोंद आहे.
कसोटी आणि टी-20 फॉरमॅडमध्ये भारतासाठी धावा केल्यानंतर जयस्वालने वनडे क्रिकेटमध्येही पदार्पण करावे, अशी इच्चा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने व्यक्त केली. कैफ म्हणाला, “सँपल साईज खूप लहान आहे. पण जयस्वालला आम्ही खूप दिवसांपासून पाहत आहोत. आम्ही त्याला रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये पाहिले आहे. त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो अविश्वसनीय खेळाडू आहे. पण अजून त्याने वनडे पदार्पण केले नाहीये. त्याला वनडेतही संधी दिली पाहिजे. तो सर्व क्रिकेट प्रकारांसाठी बनलेला आहे. गम वनडे क्रिकेट असुद्या, टी-20 क्रिकेट असुद्या किंवा कसोटी क्रिकेट असुद्या. एक फलंदाज म्हणून त्याला डिफेंस करता येते आणि आक्रमक खेळीही करता येते.”
मोहम्मद कैफने पुढे जेम्स अँडरसनसमोर जयस्वालने केलेल्या आक्रमक खेळीचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “जेव्हा त्याने मनाची तयारी केलेली असते किंवा तशी गरज असते, तेव्हा जयस्वाल पहिल्यावरून थेट पाच किंवा सहाव्या गियरवर जाऊ शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनच्या तीन चेंडूंवर तीन षटकार मारल्यानंतर स्पष्ट होते की, जयस्वाल किती यशस्वी फलंदाज आहे. जर जराही घाबरल्यासारखा वाटत नव्हता. समोर बॅझबॉल असो, अँडरसन असो किंवा इतर कोणता गोलंदाज असो. एका युवा खेळाडूसाठी आपल्या गेम प्लानला एवढ्या चांगल्या पद्धथीने अमलात आणणे सोपे नाहीये. पण जयस्वालने ते करून दाखवले.”
महत्वाच्या बातम्या –
विराट कोहलीची आरसीबीसोबत 16 वर्ष पूर्ण, एक नजर त्याच्या कारकिर्दीवर
एका वर्षात 2 आयपीएल? T20 ऐवजी T10 फॉरमॅट? बीसीसीआय मोठा बदल घडवण्याच्या तयारीत