सध्या पॉंडेचेरी येथे देवधर ट्रॉफी खेळली जात आहे. सहा विभागांच्या या स्पर्धेत रविवारी (30 जुलै) चौथ्या फेरीचे सामने खेळले गेले. दक्षिण विभागाने सलग चौथा विजय मिळवत अंतिम फेरीतील आपली जागा निश्चित केली. तर, पश्चिम विभागाने विजय मिळवत अंतिम फेरीत जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. अनुभवी मयंक अगरवाल व शिवम दुबे यांचा खेळ निर्णायक ठरला.
दिवसातील पहिल्या सामन्यात आत्तापर्यंत अजिंक्य असलेल्या दक्षिण विभाग व पूर्व विभाग यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. साई किशोर व कौशिक यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे पूर्व विभागाचा संघ निर्धारित 46 षटकात केवळ 229 धावा करू शकला. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार मयंक अगरवाल याने 84 व साई सुदर्शन याने 53 धावांची खेळी करत दक्षिण विभागाला सलग चौथा विजय मिळवून दिला. या विजयासह त्यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
दिवसातील दुसरा सामना नॉर्थ ईस्ट विरुद्ध मध्य विभाग असा झाला. आदित्य सरवटे, सारांश जैन व यश कोठारी यांच्या गोलंदाजी पुढे नॉर्थ ईस्ट संघाचा डाव केवळ 164 धावांवर संपुष्टात आला. शिवम चौधरी व यश दुबे यांच्या अर्धशतकांमुळे मध्य विभागाने हे आव्हान 8 गडी राखून पार केले.
तर तिसऱ्या सामन्यात पश्चिम विभागाने उत्तर विभागाचे आव्हान स्वीकारले. हर्षित राणा, नितीश राणा व रोहिला यांच्या अर्धशतकांमुळे उत्तर विभागाने 259 अशी मोठी मजल मारली होती. मात्र, या धावांचा पाठलाग करताना पश्चिम विभागासाठी अनुभवी शिवम दुबे याने अखेरपर्यंत नाबाद राहत 83 धावांची खेळी केली. त्याला कथन पटेल याने अर्धशतक करत साथ दिली. त्यामुळे पश्चिम विभागाने 6 गडी राखून विजय संपादन केला.
सोमवारी होणाऱ्या पाचव्या फेरीच्या सामन्यामध्ये होणारा पश्चिम विभाग विरुद्ध पूर्व विभाग हा सामना निर्णायक असेल. या सामन्यात विजेता करणारा संघ दक्षिण विभागाशी अंतिम सामन्यात खेळेल.
(Deodhar Trophy 2023 South Zone Entered In Finals Shivam Dube Helps West Zone For Win)
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर ब्रॉडने मारला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ पाहून फिरतील तुमचेही डोळे
‘ब्रॉडी तुला सलाम’, ब्रॉडच्या रिटायरमेंटवर आली युवीची प्रतिक्रिया, शेअर केले खास छायाचित्र