देशांतर्गत क्रिकेट हंगामातील दुसरी स्पर्धा देवधर ट्रॉफी सोमवारी (24 जुलै) पॉंडेचेरी येथे सुरू झाली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन सामने खेळवण्यात आले. पहिल्या दिवशी झालेल्या या तीन सामन्यांमध्ये पश्चिम विभागाने नॉर्थ ईस्टचा तब्बल 9 गडी राखून पराभव करत दमदार सुरुवात केली. याव्यतिरिक्त पूर्व विभाग व दक्षिण विभागाने देखील मोठे विजय साजरे केले.
पॉंडेचेरी येथे खेळल्या गेलेल्या दिवसातील पहिल्या सामन्यात पश्चिम विभागाने काहीशा दुबळ्या नॉर्थ ईस्ट संघावर एकतर्फी विजय नोंदवला. अर्झान नागवासवाला, शम्स मुलानी व शिवम दुबे यांच्या गोलंदाजीच्या जोरावर पश्चिम विभागाने नॉर्थ ईस्टचा डाव केवळ 207 धावांवर गुंडाळला. या धावांचा पाठलाग करताना हार्विक देसाई व प्रियांक पांचाल यांनी अनुक्रमे 85 व नाबाद 99 धावा करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात पूर्व विभागाने मध्य विभागाचा पराभव केला. मध्य विभागाने या सामन्यात रिंकू सिंग याच्या अर्धशतकाच्या जोरावर 207 धावा उभ्या केल्या होत्या. या काहीशा छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना पूर्व विभागासाठी उत्कर्ष सिंग याने 89 धावा करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
दिवसातील तिसरा सामना दक्षिण विभाग विरुद्ध उत्तर विभाग असा खेळला गेला. दक्षिण विभागासाठी रोहन कनुमल, मयंक अग्रवाल व एन जगदिशन या अनुभवी फलंदाजांनी झकावलेल्या अर्धशतकांमुळे दक्षिण विभागाने 303 धावा उभ्या केल्या होत्या व त्यानंतर उत्तर विभागाच्या फलंदाजी वेळी पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे काहीशा उशिरापर्यंत लांबलेल्या या सामन्यात उत्तर विभागाचे फलंदाज आव्हान सादर करू शकले नाहीत. विद्वत कवीरप्पा याने टिपलेल्या पाच बळींमुळे उत्तर विभागाचा संपूर्ण संघ अवघ्या साठ धावांवर सर्वबाद झाला.
(Deodhar Trophy West Zone South Zone Register Wins Rinku Singh Vidhwath Kaverappa Shines)
महत्वाच्या बातम्या –
पावसाने हुकला टीम इंडियाचा क्लीन स्वीप! त्रिनिदाद कसोटी अनिर्णित, भारताचा 1-0 ने मालिकाविजय
BREAKING: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची निवृत्ती, 30 व्या वर्षीच घेतला निर्णय