क्रिकेटटॉप बातम्या

BREAKING: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूची निवृत्ती, 30 व्या वर्षीच घेतला निर्णय

गुजरातचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज रुश कलारिया याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 2012 मध्ये अंडर 19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गुजरातचे प्रतिनिधित्व करत. यानंतर तो व्यवसायात आपली नवी कारकीर्द सुरू करू शकतो.

https://www.instagram.com/p/CvCHJ85PMi_/?igshid=MzRlODBiNWFlZA==

वयोगट क्रिकेटमध्ये छाप पडल्यानंतर त्याची 2012 अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती. हा विश्वचषक भारतीय संघाने आपल्या नावे केला होता. त्यानंतर त्याने गुजरातसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 56 प्रथम श्रेणी सामने खेळताना 173 बळी टिपले. तसेच, 49 लिस्ट ए सामन्यात 67 तर 40 टी20 सामन्यात 49 बळी त्याने आपल्या नावे केले. 2018-2019 या रणजी हंगामात सर्वाधिक बळी मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात आयपीएलसाठी सामील करून घेतले होते. मात्र, त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याने सर्वांचे आभार व्यक्त केले. रूश अंडर 19 विश्वचषकाव्यतिरीक्त इंडिया ए संघासह देखील अनेक दौऱ्यांवर सहभागी झालेला. त्या खेळाडूंचे देखील त्याने आभार मानले.

(Mumbai Indians And Former India U19 Cricketer Roosh Kalaria Annouced Retirement)

महत्वाच्या बातम्या –
BREAKING! त्रिनिदादमध्ये शेवटच्या दिवशी पावसाची हजेरी! वेस्ट इंडीजसाठी चिंतेची बाब
मनिका, नतालियाच्या अविश्वसनीय खेळाने बंगळुरू स्मॅशर्सचे यूटीटीमधील आव्हान कायम

Related Articles