विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीची निघृण हत्या करण्यात आली आहे. अवघ्या १४ वर्षांची असलेल्या क्षितीजा अनंत व्यवहारे नामक मुलीवर कबड्डी खेळतेवेळी चक्क कोयत्याने सपासप वार करुन तिचा खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण पुणे हादरले आहे. बऱ्याचशा राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत.
यातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया अकाउंटद्वारे आपले मत मांडत आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पवार यांनी लिहिले की, ‘पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणे हे सामाजिक अध:पतनाचे गंभीर लक्षण आहे.’
‘शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेने खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल,’ अशा शब्दात फेसबुक पोस्ट करत पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय;माणूसकीला काळीमा फासणारी आहे.पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 13, 2021
शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन करण्यात येईल.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 13, 2021
पवार यांच्याबरोबरच संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व नेते संतोष शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. शाळेत शिकणाऱ्या आणि कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे,’ असे ते म्हणाले.
‘छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हिंस्त्र आणि रानटी वृत्ती ही कायदेशीर पद्धतीने ठेचलीच पाहिजे. आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शासन झाले पाहिजे. १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा काय दोष…!!,’ असेही त्यांनी म्हटले आहे.
एकतर्फी प्रेमातून क्षितीजावर हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्र-मैत्रिंणीसोबत कबड्डी खेळताना तिच्यावर हा हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. ते आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
DCच्या ‘या’ गोलंदाजाची लॉटरी, आयपीएलमधील प्रदर्शनामुळे भारताच्या टी२० विश्वचषक संघात लागणार वर्णी!
कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात कोहलीच्या हाती निराशा; ‘तुझा अभिमान आहे’, म्हणत बहिणीने वाढवलं मनोबल
‘या’ क्रिकेटरची बड्डेदिनी स्वत:लाच ग्रेटभेट, शतक ठोकत मोडला मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम