एशिया कप स्पर्धेत भारताचा सामना हॉंगकॉंग सोबत झाला. भारत जिंकलाही आणि सर्वांना तेच अपेक्षित होते. भारताला एवढा संघर्ष करावा लागेल याचा कोणीही विचार केला नव्हता. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला आणि एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.
धोनीने वनडे सामन्यात जेवढी शतके केली आहेत तेवढ्याच वेळा धोनी शून्यावर बाद झाला आहे. धोनीच्या नावावर सध्या 9 शतके आहेत आणि 9 वेळा तो शून्यावर बाद झाला आहे.
भारताकडून डावखुरा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने 11 शतक केली आहेत तर 11 वेळा तो शून्यावर बाद झाला आहे. तो सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. त्यानंतर धोनी (9, 9), मोहींदर अमरनाथ (2, 2), हेमांग बदानी (1,1) केएल राहुल (1,1) यांच्या क्रमांक लागतो.
धोनीने शून्यावर बाद होण्याची सुरुवात 2004 मध्ये बांग्लादेश विरूध्द केली. त्यानंतर 2005 श्रीलंका, 2007 बांग्लादेश, 2007 श्रीलंका, 2007 दक्षिण अफ्रिका, 2010 ऑस्ट्रेलिया, 2013 इंग्लड, 2016 ऑस्ट्रेलिया, 2018
हॉंगकॉंग.
धोनी, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या देशांविरूध्द दोनदा शून्यावर बाद झाला आहे आणि इंग्लड , हॉंगकॉंग, दक्षिण अफ्रिका या देशांविरूध्द एकदा शून्यावर बाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-एशिया कप २०१८: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मैदानाबाहेर; टीम इंडियाला मोठा धक्का
-Video: टीम इंडियाने सामन्यानंतर हाँग काँगला दिली खास भेट
–एशिया कप २०१८: कुलदीप यादवची विक्रमांची मांदियाळी