---Advertisement---

का ‘कॅप्टनकूल’ने निवृत्तीसाठी निवडली होती ७.२९ ही वेळ? घ्या जाणून कारण

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 2:26 PM
dhoni icc
---Advertisement---

दोन वर्षांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वजण चकित झाले होते. धोनीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन निवृत्तीची घोषणा केली होती.

धोनीने त्याच्या कारकिर्दीचा झलक दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये बॅकग्राउंडला मुकेश यांचे ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हे गाणे वाजत होते. या व्हिडिओखाली धोनीने लिहिले होते की, “सर्वांच्या प्रेमासाठी आभार. आज संध्याकाळी ७.२९ नंतर मला निवृत्त समजा.”

धोनीची ही पोस्ट पाहून त्याच्या सर्व चाहत्यांना एक प्रश्न पडला असणार. तो असा की, धोनीने त्याच्या निवृत्तीसाठी नक्की ७.२९ ही वेळ का निवडली असेल? आपणा सर्वांना हे माहिती आहे की, धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात खेळला होता. २०१९ साली विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि तोच सामना धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.

या सामन्यात धोनी बरोबर ७.२९ वाजता मार्टिन गप्टिलच्या हातून धावबाद झाला होता. आपल्या शेवटच्या सामन्यात धोनीने ७२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. कदाचित धोनीच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यावर ७.२९ वाजता विराम लागला, म्हणून त्याने निवृत्तीसाठी ही वेळ निवडली असावी. Details Why Ms Dhoni Decided To Retire On 7.29 o Clock

https://www.instagram.com/tv/CD6ZQn1lGBi/?utm_source=ig_web_button_share_sheet

धोनीला भारतीय संघातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला ३ आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. यामध्ये २००७ सालचा टी२० विश्वचषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश होतो. जरी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताचा मोठ्ठा फॅन आहे ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या, फोटो शेअर करत दिल्या हटके शुभेच्छा!

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने अचानक दिलेला निवृत्तीचा धक्का, सुवर्ण युगाचा झालेला अंत

स्वातंत्र्यदिन विशेष: १९८३ सालचा वर्ल्डकप ते २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी, वाचा भारतीय क्रिकेटमधील सोनेरी क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---