बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी डिसेंबर 2024 मध्ये पदभार स्वीकारला. जय शाह यांच्या जाण्यानंतर बीसीसीआयमध्ये त्यांची जागा रिक्त झाली आहे.
आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, जय शाह आयसीसीमध्ये गेल्यानंतर देवजीत सैकिया यांना बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी मिळू शकते. या रिपोर्टनुसार ते या रेसमध्ये आघाडीवर आहेत. सैकिया हे सध्या बीसीसीआयचे अंतरिम सचिव आहेत. तर प्रभातेजसिंग भाटिया यांची कोषाध्यक्षपदी निवड होऊ शकते.
वास्तविक, जय शाह गेल्यानंतर सैकिया यांची अंतरिम सचिव म्हणून निवड झाली. ते प्रथम श्रेणी क्रिकेटपटू राहिले आहेत. सैकिया आसामचे आहेत. ते सीके नायडू ट्रॉफीमध्ये आसामकडून खेळले आहेत. याशिवाय ते सौरवही गांगुलीच्या टीमचाही भाग राहिले आहेत. गांगुली आणि सैकिया पूर्व विभागाकडून एकत्र खेळले होते. 1991 मध्ये त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. 2019 मध्ये त्यांची बीसीसीआयचे सहसचिव म्हणून निवड झाली होती. सैकिया यांनी अलीकडेच आयसीसीमध्ये बीसीसीआयचं प्रतिनिधित्व केलं होतं. शाह यांनी पदभार स्वीकारला तेव्हा ते दुबई येथे झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते.
बीसीसीआयच्या सचिवपदासाठी सैकिया यांच्यासोबतच गुजरातचे अनिल पटेल यांचंही नाव चर्चेत आहे. या यादीत रोहन जेटली यांच्या नावाचाही समावेश आहे. पण जेटली सध्या दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे तो बीसीसीआयमध्ये प्रवेश करतील की नाही, याबाबत शाश्वती नाही. कोषाध्यक्षाबद्दल बोलायचं झालं तर, प्रभातेजसिंग भाटिया यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते. ते छत्तीसगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत.
बीसीसीआयच्या निवडणुका यावर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहेत. बीसीसीआयच्या नवीन सचिवाची निवड होईपर्यंत सहसचिव सैकिया हेच या पदाचा कार्यभार सांभाळतील. बीसीसीआय सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ कधी जाहीर होणार? निश्चित तारीख जाणून घ्या
माजी क्रिकेटपटूचा गौतम गंभीरच्या कोचिंगवर सवाल, एकापाठोपाठ एक सांगितल्या अनेक चुका!