यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL Season 18) 37वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात खेळला गेला. दोन्ही संघ चंदीगढच्या मैदानावर आमने-सामने होते. यामध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने बाजी मारली. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या सामन्यात पंजाबकडून मिळालेल्या पराभवनंतर आरसीबीने दमदार पुनरागमन करत पंजाबचा 7 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यात आरसीबीच्या विजयात डावखुरा फलंदाज देवदत्त पडीक्कलने (Devdutt Padikkal) मोलाची भूमिका बजावली.
158 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर आरसीबीसाठी विराट कोहली आणि फिल साॅल्ट यांनी सलामी दिली. पण आरसीबीची सुरूवात निराशाजनक राहिली. कारण फिल साॅल्ट पहिल्याच षटकात तंबूत परतला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयरच्या रूपात डावखुरा फलंदाज देवदत्त पडीक्कल मैदानात उतरला. पहिल्या चेंडूपासूनच तो आक्रमक अंदाजात होता. त्याने विराट कोहलीसोबत विजयी भागीदारी रचली. पडीक्कलने 35 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 4 उत्तुंग षटकार ठोकले. त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे आरसीबीला विजय गाठणे अधिक सोपे झाले.
पण असे असले तरी या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नाबाद 73 धावांची खेळी केलेल्या विराट कोहलीला देण्यात आला. पण विराट मात्र सामनावीर पुरस्कार भेटल्यावर नाखूष दिसला. सामनावीर पुरस्कार भेटल्यानंतर विराट कोहली म्हणाला, “मला वाटते की, देवदत्त पडीक्कलने आजच्या सामन्यात फरक पाडला आहे, हा पुरस्कार त्यालाच द्यायला हवा होता, मला माहित नाही की त्यांनी तो मला का दिला.”
Welcome #YuziChahal, says #DevduttPadikkal! ❤
— Star Sports (@StarSportsIndia) April 20, 2025
A thumping MAXIMUM into the stands as #RCB inch closer for their REVENGE! 💪🏻
Watch the LIVE action ➡ https://t.co/dJsow1beL1#IPLRevengeWeek 👉 #PBKSvRCB | LIVE NOW on Star Sports 2, Star Sports 2 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/p7ZznRmWIH
4 Runs through Running, very rare in Cricket!
— CricketGully (@thecricketgully) April 20, 2025
Outstanding Running between Devdutt Padikkal and Virat Kohli.pic.twitter.com/Uaj5oMOzFD
A 30 BALL FIFTY BY DEVDUTT PADIKKAL.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 20, 2025
– A solid half century in the run chase! pic.twitter.com/SqnGM5J1xU