---Advertisement---

RCB vs PBKS: नेहाल वढेराच्या विकेटनंतर विराटचे ‘कोल्ड सेलिब्रेशन’ पाहा VIDEO

On: रविवार, एप्रिल 20, 2025 6:49 PM
---Advertisement---

आज (20 एप्रिल) यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 37वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) संघात खेळला जात आहे. तत्पूर्वी भारतीय दिग्गज विराट कोहली (Virat Kohli) केवळ त्याच्या उत्कृष्ट खेळासाठीच नाही तर त्याच्या उत्कृष्ट आक्रमक सेलिब्रेशनसाठी देखील प्रसिद्ध आहे. सामन्यादरम्यान, जेव्हा जेव्हा त्याच्या संघातील गोलंदाज विकेट घेतो तेव्हा कोहली तो विकेट घेतल्यासारखा साजरा करतो. कोहलीचा हा उत्सव आयपीएलमध्येही सुरूच आहे. पंजाबविरूद्धच्या सामन्यात नेहल वढेराची विकेट पडल्यानंतर कोहली ‘कोल्ड सेलिब्रेशन’ करताना दिसला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

ही घटना पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) नवव्या षटकात घडली, जेव्हा सुयश शर्मा गोलंदाजी करत होता. जोश इंग्लिसने या षटकातील शेवटचा चेंडू लॉन्ग ऑफच्या दिशेने खेळला आणि पटकन एक धाव पूर्ण केली. नेहलला दुसरी धाव घ्यायची होती आणि तो पटकन दुसऱ्या टोकाकडे धावला, पण इंग्लिशने प्रतिसाद दिला नाही. टिम डेव्हिडने चेंडू फेकला, कोहलीने तो पकडला आणि गोलकीपरकडे फेकला. अशाप्रकारे जितेशने नेहलला सहज धावबाद केले. अशाप्रकारे, गैरसमजामुळे नेहल धावबाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.

नेहल बाद होताच कोहलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो मजेदार पद्धतीने आनंद साजरा करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पंजाबसाठी सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 194.12च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 1 षटकार ठोकला. तर शशांक सिंगने नाबाद 31 धावांची खेळी केली. यष्टीरक्षक जोश इंग्लिस 29 धावा करण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर मार्को जॅन्सन 25 आणि प्रियांश आर्य 22 धावा यांच्या जोरावर पंजाबचा संघ 157 धावा करण्यात यशस्वी ठरला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू- फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, क्रुणाल पांड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल

इम्पॅक्ट प्लेयर- देवदत्त पडिक्कल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग

पंजाब किंग्ज- प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅन्सन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर- हरप्रीत ब्रार, विजयकुमार विशक, सूर्यांश शेडगे, ग्लेन मॅक्सवेल, प्रवीण दुबे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---