युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या देवदत्त पड्डीकलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने बेंगलोर संघात सलामीला येऊन पावरप्लेमध्ये आक्रमक फटकेबाजी करत स्वतची वेगळी ओळख निर्माण केली. २०२१ च्या आयपीएल सत्रात देखील तो बेंगलोर संघाकडून खेळताना दिसणार आहे. अशातच आयपीएल स्पर्धेपूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
१४० चेंडूत ठोकल्या १५२ धावा
कर्नाटक संघाचा आक्रमक फलंदाज पड्डीकलने, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ओडिसा संघाविरुद्ध खेळलेल्या खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या सामन्यात त्याने १४० चेंडूंमध्ये १५२ धावांची खेळी केली आहे. यात त्याने ५ षटकार आणि १४ चौकार लगावले. या खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाला ५० षटकाखेर ५ बाद ३२९ धावा करण्यात यश आले.
कर्नाटक संघाचा मोठ्या फरकाने विजय
ओडिसा संघाविरुद्ध झालेल्या या सामन्यात कर्नाटक संघाला चांगली सुरुवात मिळाली. सलामीला आलेल्या फलंदाजांनी पहिल्या विकेट साठी १४० धावा केल्या. त्यानंतर कर्णधार समर्थ ६० धावा करत माघारी परतला. पुढे सिद्धार्थसोबत मिळून पड्डीकलने दुसऱ्या विकेट साठी ६५ धावा केल्या. त्यानंतर करून नायर सोबत मिळून त्याने ७५ धावांची भागीदारी केली. शेवटी अभिमन्यु मिथुनने ५ षटकार मारत १७ चेंडूवर ४० धावा केल्या. या खेळींच्या जोरावर कर्नाटक संघाला ५ बाद ३२९ धावा करण्यात यश आले. प्रत्युत्तरात ओडिसा संघ २२८ धावांवर गारद झाला. परिणामी कर्नाटकने १०१ धावांच्या फरकाने सामना जिंकला.
देवदत्त पडिक्कलची कामगिरी
आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी येणाऱ्या देवदत्त पड्डीकलने आपल्या प्रतिभेची छाप पाडली होती. आयपीएल २०२० मध्ये खेळलेल्या १५ सामन्यात त्याने ४७३ धावा केल्या होत्या. यात त्याने ५ अर्धशतक देखील झळकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ओ भाई, जरा रुको! अचानक चाहता मैदानावर धावत आल्याने घाबरला विराट कोहली, व्हिडिओची रंगली चर्चा
अष्टपैलू युवराज सिंगवर अटकेची टांगती तलवार, सुप्रीम कोर्टात घेतली धाव; आज होणार सुनावणी