क्रिकेटविश्वात सर्वत्र सध्या कसोटी सामन्यांचा थरार सुरू आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ऍशेस मालिका अशा कसोटी मालिका सुरू असताना बांगलादेशचा संघही न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला आहे. १ जानेवारीपासून उभय संघांमध्ये (BAN vs NZ) माउंट माउंगानुई, बे ओव्हल स्टेडिमय येथे पहिला कसोटी सामना (First Test) सुरू आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर पाहुणा न्यूझीलंडचा संघ १७ धावांनी आघाडीवर आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवसादरम्यान न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवे (Devon Conway) हा खूप हताश (Devon Conway Sad) झाल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, २९ धावांवर कर्णधार टॉम लॅथमच्या रूपात न्यूझीलंड संघाला पहिला धक्का बसला होता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कॉनवे फलंदाजीला आला होता. पहिल्या डावात १२२ धावांची धुव्वादार शतकी खेळणाऱ्या कॉनवेला या डावातही संघासाठी मोठ्या आकडी धावा करायच्या होत्या. परंतु तो केवळ १३ धावांवरच (Devon Conway Out On 13 Runs) पव्हेलियनला परतला. ४९ चेंडूंचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने त्याने या धावा केल्या.
डावातील २५ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा गोलंदाज एबादत हुसैनच्या रहस्यमयी चेंडूवर शादमान इस्लामच्या हाती झेल तो झेलबाद झाला. इतक्या कमी धावांवर आपली विकेट गमावल्याने ३० वर्षीय कॉनवे नाराज झाला. बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर जाताना तो मान खाली घालून गेला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.
Devon Conway falls for 13. A little edge. Ross Taylor joins @CentralStags teammate Will Young in the middle. Follow play LIVE with @sparknzsport. #NZvBAN pic.twitter.com/KwWRFuMsBG
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 4, 2022
हेही वाचा- भारतासाठी वाजली धोक्याची घंटा! जखमी कॉनवेच्या जागी ‘या’ धाकड अष्टपैलूची न्यूझीलंड संघात वर्णी
दरम्यान पहिल्या डावात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३२८ धावा केल्या होत्या. यात कॉनवेच्या सर्वाधिक १२२ धावांचा समावेश होता. तसेच हेनरी निकोलसच्या ७५ धावा आणि सलामीवीर विल यंगच्या ५२ धावांचा समावेश होता. या डावात बांगलादेशकडून शोरिफुल इस्लाम आणि मेंहदी हसनच्या सर्वाधिक ३ विकेट्सचा घेतल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशकडून कर्णधार मोमिनुल हकने सर्वाधिक ८८ धावा केल्या होत्या. तसेच महमुदुल हसन जॉय (७८ धावा), लिटन दास (८६ धावा), नजमुल शांटो (६४ धावा) यांनी अर्धशतकी धावा केल्या होत्या. परिणामी बांगलादेशने ४५८ धावा फलकावर नोंदवल्या होत्या.
त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना चौथ्या दिवसाखेर ५ बाद १४७ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडून रॉस टेलर ३७ धावा आणि रचिन रविंद्र ६ धावांवर खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
नाणेफेक होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विराटने रहाणेला सांगितले नक्की कुठे होतोय त्रास
बुम बुम बुमराह!! रबाडाच्या बाऊन्सरवर बुमराहचा कडक षटकार; पत्नी संजनाने दिली अशी रिॲक्शन
रणजी ट्रॉफीवर टांगती तलवार! स्पर्धेच्या १० दिवस आधी या संघाच्या ७ जणांना कोरोनाची लागण
हेही पाहा-