---Advertisement---

कॉनवेच्या जिद्दीला सलाम! दुखापतग्रस्त असूनही संघाला चॅम्पियन बनवण्यात करतोय खेळाडूंची मदत- Video

On: रविवार, नोव्हेंबर 14, 2021 10:59 AM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पडणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. परंतु या सामन्यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील विस्फोटक फलंदाज डेवोन कॉनवे दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. परंतु दुखापतग्रस्त असताना देखील तो असे काहीतरी कृत्य करताना दिसून आला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

डेवोन कॉनवेला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. परंतु इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे त्याला अंतिम सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये कॉनवे आपला संघ सहकारी टीम सिफर्टकडून यष्टिरक्षणाचा सराव करून घेताना दिसून येत आहे.

यावर कॅप्शन म्हणून न्यूझीलंड क्रिकेटने, “दुबईमध्ये यष्टिरक्षक सराव करत आहेत,” असे लिहिले आहे. दुखापतग्रस्त असताना देखील संघासाठी मोलाचे सहकार्य करत असलेल्या डेवोन कॉनवेचे सोशल मीडियावर भरपूर कौतुक केले जात आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात झाला होता दुखापतग्रस्त
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना पार पडला होता. या सामन्यात बाद झाल्यानंतर आपल्याच बॅटमुळे डेवोन कॉनवेला दुखापत झाली होती. इंग्लंड विरुद्ध झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक दिली. या सामन्यात डेवोन कॉनवेने ३८ चेंडूंमध्ये ४६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर बाद झाल्यानंतर आपल्याच बॅटमुळे त्याला दुखापत झाली होती. त्याच्या जखमेच्या एक्स-रे अहवालामध्ये त्याच्या उजव्या हाताचे बोट तुटल्याचे दिसून आले आहे.

न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी टी२० विश्वचषक अंतिम सामना तोंडावर असताना डेवॉन कॉनवेचे संघाबाहेर होणे दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, “अशाप्रकारे बाहेर पडल्याने तो पूर्णपणे निराश झाला आहे. डेवोन न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी अत्यंत उत्सुक होता म्हणून आम्ही खरोखरच त्यांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या-

दोन टप्पी चेंडूवर षटकार मारणाऱ्या वॉर्नरची पाकिस्तानी दिग्गजाकडूनच स्तुती; म्हणाले, ‘त्याला माहिती होते..’

भारतासाठी वाजली धोक्याची घंटा! जखमी कॉनवेच्या जागी ‘या’ धाकड अष्टपैलूची न्यूझीलंड संघात वर्णी

क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवणारे भारतीय शिलेदार, विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---