---Advertisement---

कसोटी पदार्पणात द्विशतक ठोकणाऱ्या कॉनवेवर ‘या’ आयपीएल संघांची नजर, लावतील कोट्यावधींच्या बोली

On: मंगळवार, जून 22, 2021 4:30 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये एक गोष्ट फार चांगली आणि फायदेशीर आहे. ती म्हणजे, आयपीएल नवोदित खेळाडूंला संधी मिळत असते. दरवर्षी कोणता तरी नवीन चेहरा जागा समोर येतोच येतो. आयपीएल हे एक असे स्थान आहे, जिथे प्रतिभाशाली खेळाडूंना प्राधन्य दिले जाते. आज भारतीय संघ एकाच वेळेस दोन संघ विदेशी दौऱ्यावर घेऊन जाऊ शकतो. याचं मुख्य कारण म्हणजे आयपीएलमध्ये प्रतिभाशाली युवा खेळाडूंना दिलेली संधी.

आयपीएलमध्ये जेवढा भारतीय खेळाडूंचा दबदबा असतो, तेवढाच परदेशी खेळाडूंचाही धाक असतो. आज अशा एका युवा परदेशी खेळाडूबद्दल आपण बोलणार आहोत, जो सध्या त्याचा देशासाठी तिन्ही प्रकरच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावत आहे. ज्या खेळाडूबद्दल आपण बोलत आहोत तो न्यूझीलंड संघाचा खेळाडू ‘डेवोन कॉनवे’ आहे.

कॉनवे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड संघासाठी तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवत आहे. आजच्या घडीला कॉनवेची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हल्लीच त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणातच द्विशतक केले होते. तेव्हापासून कॉनवे क्रिकेटच्या दुनियेत अजून चमकला आहे. त्याने न्यूझीलंड संघासाठी ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने २२५ धावा केल्या आहेत. सोबत १ शतक आणि १ अर्धशतक सुद्धा मारले आहे. तसेच १४ टी-२० सामन्यातून ४७३ धावा केल्या आहेत. यात त्याने ४ अर्धशतकेसुद्धा केली आहेत. त्यामुळे आयपीएलमधील काही संघ नक्कीच कॉनवेवर नजर ठेऊन असणार.

पंजाब किंग्स
केएल राहुलचा संघ पंजाब किंग्स, कॉनवेला संघात घेण्यासाठी जास्त बोली लावू शकतात. डेविड मलानच्या अनुपस्थित आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये कॉनवे पंजाबसाठी चांगला पर्याय होऊ शकतो. कॉनवेला विकत घेतल्यास पंजाब संघाची फलंदाजी फळी अजून भक्कम होईल. तो कर्णधार राहुलसोबत सलामीला मोठ्या आकडी खेळी करु शकतो.

राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स संघाकडे इंग्लंडचे प्रमुख तीन खेळाडू आहेत. इंग्लंड संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे इंग्लंड संघाचे खेळाडू जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि जॉस बटलर हे अनुपस्थित असतील. त्यामुळे, राजस्थान रॉयल्स संघ सलामी फलंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी डेवोन कॉनवेला संघात घेऊ शकतात.

कोलकाता नाईट राइडर्स
कोलकाता नाईट रायडर्स संघसुद्धा डेवॉन कॉनवेवर जास्त बोली लावायची तयारी दाखवेल. कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा फलंदाजी करू शकतो आणि केकेआरकडे गेले काही हंगाम वरच्या फळीतील फलंदाजाची कमी राहिली आहे. त्यामुळे कॉनवेला घेऊन केकेआर संघ त्यांची जागा भरू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तान संघाला जबर धक्का, टी२० विश्वचषक २०२२पर्यंत करारबद्ध असलेल्या प्रशिक्षकाने घेतली माघार

शुभमनने सांगितला विराटसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, ‘या’ कारणामुळे होऊ शकलं नाही बोलण

जॉनी बेयरस्टोने निवडला आपला ‘सर्वोत्कृष्ट सार्वकालिन संघ’, केवळ एका भारतीयाला दिली जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---