आयपीएल 2023 मध्ये रविवारी (23 एप्रिल) दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात सीएसकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. हंगामातील सर्वात यशस्वी सलामी जोडी असलेल्या ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या जोडीने पुन्हा एकदा संघाला पाऊण शतकी भागीदारी केली. कॉनवे याने या हंगामातील आपला दमदार फॉर्म कायम राखत आणखी एक अर्धशतक आपल्या नावे केले.
ऋतुराज व कॉनवे या जोडीने पहिल्या षटकापासून केकेआरच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेत त्यांनी चौकार षटकार वसूल केले. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 73 धावा केल्या.
कॉनवे याने या सामन्यात 40 चेंडूवर 56 धावांची आक्रमक खेळी केली. यामध्ये सहा चौकार व चार षटकारांचा समावेश होता. आपला दुसराच हंगाम खेळत असलेल्या कॉनवेने कमालीचे सातत्य दाखवले आहे. मागील चारही सामन्यात त्याला अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे.
गुजरात विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो केवळ एका धावेवर बाद झालेला. मात्र, त्यानंतर त्याने पुढील दोन सामन्यात अनुक्रमे 47 व 0 धावा केल्या. परंतु, त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा थांबलेल्या नाहीत. राजस्थानविरुद्ध त्याने 50 धावांची खेळी केली. आरसीबीविरुद्ध 77 व हैदराबादविरुद्ध 83 धावा करण्यात त्याला यश आलेले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने अर्धशतक पूर्ण करत हंगामात सलग चार अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला.
त्याने हंगामात आतापर्यंत 7 सामने खेळताना 52.33 च्या सरासरीने 314 धावा केल्या आहेत. आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत फाफ डू प्लेसिसनंतर त्याचाच क्रमांक लागतो.
(Devon Conway Consistent Performance For CSK As Opener In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिन्नास्वामीवर आरसीबीचा पुन्हा जलवा! टॉपर राजस्थानला दिली 7 धावांनी मात, फाफ-मॅक्सवेल चमकले
ईडन गार्डन्सवर केकेआरने जिंकली नाणेफेक, सीएसकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण