---Advertisement---

सीएसकेच्या स्टार खेळाडूने केंद्रीय करार नाकारला, टी20 लीगला दिले प्राधान्य; मुख्य संघाला मोठा धक्का

Devon Conway & Ruturaj Gaikwad
---Advertisement---

सध्या क्रिकेट विश्वात टी20 फ्रँचायझी लीगचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. ज्यामध्ये अनेक खेळाडू त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रीय संघांचे करार नाकारत आहेत. जेणेकरून ते वेगवेगळ्या लीगमध्ये अधिक खेळू शकतील. आता या यादीत न्यूझीलंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवेचे नावही सामील झाले आहे.

वास्तविक, डेव्हाॅन काॅनवेने न्यूझीलंडचा केंद्रीय करार नाकारला आहे. मात्र, कॉनवेने स्वतःला पूर्णपणे नाकारले नाही. त्याचा माजी कर्णधार केन विल्यमसन सारखाच करार आहे. या खेळाडूने स्वतःला बहुतांश सामन्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. परंतु जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार नाही. त्यादरम्यान कॉनवे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी20 लीगमध्ये सहभागी होणार आहे.

जेव्हा न्यूझीलंडने आपला वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला तेव्हा त्यात डेव्हॉन कॉनवेचे नाव सामील होते. मात्र, आता त्याने यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील अफगाणिस्तान कसोटी आणि श्रीलंका दौऱ्यासाठी कॉनवेचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी, तो पुढील कसोटी सामन्यांसाठीही उपलब्ध असेल आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याआधी पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणी मालिकेसाठीही त्याने स्वत:ला उपलब्ध ठेवले आहे.

त्याच्या निर्णयाबद्दल डेव्हॉन कॉनवे म्हणाला: सर्वप्रथम, मी न्यूझीलंड क्रिकेटला या प्रक्रियेद्वारे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो, केंद्रीय करारातून दूर जाण्याचा निर्णय सोपा नाही, परंतु मला विश्वास आहे की यावेळी माझ्यासाठी योग्य निर्णय आहे आणि माझ्या कुटुंबासाठी काय चांगले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधील महत्त्वाच्या कालावधीसाठी आगामी कसोटी संघाचा भाग होण्यासाठी मी उत्साहित आहे आणि निवड झाल्यास पुढील फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे.

डेव्हॉन कॉनवेसोबतच स्फोटक सलामीवीर फिन ऍलननेही न्यूझीलंडच्या केंद्रीय करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कॉनवेसारखे वेगळे विशेष कंत्राट मिळालेले नसले तरी गरज पडल्यास तो निवडीसाठी उपलब्ध असेल.

हेही वाचा-

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने फडकवला तिरंगा, पत्नी मुलींसह अनोख्या पद्धतीने केला स्वातंत्र्य दिन साजरा
टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर, 54 ची सरासरी, तरी ही दुलीप ट्राॅफीतून वगळले! या खेळाडूची प्रतिभा धूळखात?
कसोटी क्रिकेटपासून हार्दिक खूपच लांब! दुलीप ट्राॅफीमध्येही नाही खेळणार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---