चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे आयपीएल २०२२मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात संधी दिल्यानंतर कॉन्वेला बाकावर बसवण्यात आले होते. परंतु पुन्हा एमएस धोनीच्या हाती नेतृत्त्वाची सूत्रे आल्यानंतर त्याने कॉन्वेला संधी दिली आणि कॉन्वेनेही आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल २०२२मधील ५५व्या सामन्यात त्याने ४९ चेंडूंमध्ये ८७ धावांची तुफानी खेळी केली. हे त्याचे आयपीएलमधील सलग तिसरे अर्धशतक होते. या मॅच विनिंग खेळीचे श्रेय कॉन्वेने संघनायक धोनीला दिले आहे.
धोनीचा सल्ला (MS Dhoni Advice) ऐकत मी फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठमोठे षटकार मारत आहे आणि माझ्या संघासाठी मॅच विनिंग खेळी खेळत असल्याचे कॉन्वेने (Devon Conway) सांगितले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाला कॉन्वे?
दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर कॉन्वे म्हणाला की, “मागच्या सामन्यात मी स्पिनर गोलंदाजांविरुद्ध अधिकतर स्वीप शॉट खेळलो होतो. याच शॉटमुळे मी विकेटही गमावली होती. परंतु त्यानंतर धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, मी अधिकतर स्वीप शॉट मारतो. त्यामुळे स्पिनर्स सहसा माझ्याविरुद्ध चेंडू थोडा पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी पुढे येऊन बॅट सरळ ठेवत फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा.”
कॉन्वेने धोनीला हा सल्ला ऐकला आणि स्पीप किंवा रिव्हर्स स्वीप खेळताना पावलांचाही वापर केला. तसेच त्याने दिल्लीविरुद्ध अक्षर पटेल व कुलदीप यादव यांच्याविरोधात पुढे येऊन शॉट खेळले आणि षटकारही मारले.
माइक हसीही करतोय मदत
धोनीव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू माइक हसी देखील कॉन्वेला मदत करत आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी कॉन्वेने माइक हसीशी चर्चा केली होती, ज्याचा फायदा त्याला झाला.
कॉन्वेचा हा पहिला आयपीएल हंगाम असून त्याने ४ सामने खेळताना ७७च्या प्रशंसनीय सरासरीने २३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली आहेत, जी त्याने दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजी करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये बॅट खाताना दिसला धोनी, असे का करतो थाला? घ्या जाणून
पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video