---Advertisement---

तिसऱ्या कसोटीपूर्वी संघाला धक्का! स्टार खेळाडू बाहेर, मालिका गमावण्याचा धोका?

Devon Conway
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची  कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना 14 डिसेंबरला होणार आहे. हा सामना जिंकून किवी संघ क्लिन स्वीप टाळू इच्छितो. मात्र याआधीच न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज डेव्हॉन कॉनवे तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला असून त्याच्या जागी बदली खेळाडूची निवड करण्यात आली आहे.

सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉनवे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळला होता. ज्यामध्ये त्याने आपल्या फलंदाजीने मोठी खेळी करता आली नाही. चार डावात त्याला फक्त 21 धावा करता आल्या. आता तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. या आठवड्यात तो वेलिंग्टनमध्ये त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्माची वाट पाहत आहे. तो त्याच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहे. त्याच्या  जागी मार्क चॅपमनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की अश्या स्थितीत कुटुंब प्रथम येते. डेव्हॉन आणि त्याची पत्नी किम यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण खरोखरच उत्सुक आहोत. मार्क नुकताच भारताच्या कसोटी संघासोबत होता. याशिवाय त्याने प्लंकेट शील्डमध्ये 276 धावा केल्या असून तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी संघात सामील होण्याची ही चांगली वेळ आहे.

मार्क चॅपमनने अद्याप न्यूझीलंडकडून कसोटी पदार्पण केलेले नाही. पण या 30 वर्षीय फलंदाजाने एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. चॅपमनने आतापर्यंत 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 564 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. याशिवाय 78 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1551 धावा आहेत.

हेही वाचा-

“आता नाही तर कधी …” मोहम्मद शमीच्या पुनरागमनाच्या निर्णयाबाबत माजी क्रिकेटपटूने बीसीसीआयला सुनावले
भारताला मागे टाकत इंग्लंडची ऐतिहासिक कामगिरी, WTC मध्ये अभिमानास्पद इतिहास रचला!
रोहित शर्मा संघाच्या नेतृत्वात का फ्लॉप ठरतोय? माजी क्रिकेटपटूनं दिलं धक्कादायक उत्तर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---