---Advertisement---

क्रिकेटसाठी त्याने अलिशान घर, महागडी गाडीसह सर्व विकले, आता आली अशी वेळ..

On: मंगळवार, मे 5, 2020 7:22 PM
---Advertisement---

एक खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट खेळण्यासाठी खूप मेहनत घेतो. तो वर्षेनुवर्षे सराव करतो. तसेच कठीण परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करणे हेच त्या खेळाडूचे अंतिम लक्ष्य असते. तरी काही खेळाडू असेही आहेत, ज्यांनी कठोर परिश्रम घेऊनही मोठ-मोठे त्यागसुद्धा केले आहेत.

क्रिकेट जगतात असे एक नाव समोर आले आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्यासाठी आपले घर-दार, मालमत्ता सर्वकाही विकले आहे. इतकेच नव्हे तर, त्याने आपला देशही सोडला आहे. तो खेळाडू इतर कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) खेळाडू डेव्हन कॉनवे (Devon Conway) आहे.

वयाच्या २६ वर्षापर्यंत कॉनवे आपल्या देशात गॉटेंग या संघाकडून खेळला. परंतु राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यामुळे त्याने आपला दक्षिण आफ्रिका देेश सोडून न्यूझीलंडला जाण्याचा निर्णय घेतला. कॉनवे दक्षिण आफ्रिका सोडून न्यूझीलंडची (New Zealand) राजधानी वेलिंग्टनमध्ये (Wellington) स्थायिक झाला.

त्याचे स्वप्न आहे की, एक दिवशी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार. तसेच असे मानले जात आहे की येत्या ऑगस्ट महिन्यानंतर हे होऊ शकते. कारण दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू मागील ३ वर्षांपासून न्यूझीलंडचा नागरिक आहे. तसेच त्याला आता देशाच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळण्याचा अधिकारही मिळाला आहे.

डावखुरा फलंदाज कॉनवेने न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाल्यानंतर चमकदार कामगिरी करत धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. त्याने वेलिंग्टन संघाकडून खेळताना १७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ७२.६३ च्या सरासरीने १५९८ धावा केल्या होत्या. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅंटर्बरी संघाविरुद्ध खेळताना त्रिशतकही ठोकले होते. त्याने नाबाद ३२३ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीनंतर असे मानले जात आहे की, येत्या ऑगस्टमध्ये त्याला न्यूझीलंड संघात सामील केले जाऊ शकते.

कॉनवे सध्या वेलिंग्टनमधील एका छोट्याश्या घरात राहतो. त्याच्याकडे एक लहान कार गाडी आहे. परंतु तो दक्षिण आफ्रिकामध्ये जेव्हा राहत होता, तेव्हा त्याचे आयुष्य व्यवस्थित होते. तो लग्झरी कार चालवत होता. तो खूप श्रीमंत होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी त्याने सर्वकाही सोडले.

एका मुलाखतीत कॉनवेने खुलासा केला की, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रूटकडून (Joe Root) खूप काही शिकला आहे. तो या खेळाडूंंच्या चेंडू खेळण्यापूर्वीची पायाची हालचाल पाहतो. सुरुवातीला कॉनवेने विराटप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला व्यवस्थित काही जमले नाही आणि त्याच्या फॉर्मवर परिणाम झाला. त्याला प्रशिक्षकाने या रणनीतीचा वापर न करण्यास सांगितले. परंतु त्याने स्वत:वर विश्वास ठेवला आणि न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार फलंदाज बनून दाखविले.

ट्रेंडिंग घडामोडी-

-६ असे रोहमहर्षक टी२० सामने, ज्यात भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकला होता विजय

-हे ४ भारतीय आहे ज्यांनी वनडेत गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते

-धावा घेताना सर्वाधिक चूका करणाऱ्या जगातील ५ फलंदाजांच्या जोड्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---