आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी माजी विजेता सनरायझर्स हैदराबाद संघ त्यांच्या खेळाडूंच्या आत-बाहेर होण्याने अडचणीत आहे. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोने वैयक्तिक कारणांमुळे दुसऱ्या टप्प्यात खेळण्यास आधीच नकार दिला आहे. त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्डचा संघात समावेश करण्यात आला आहे. तथापि, या सर्व चिंतांपासून दूर, संघाचा सलामीवीर आणि माजी कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएल २०२१ च्या तयारीमध्ये व्यस्त आहे.
वॉर्नर सध्या क्वारंटाईनमध्ये आपला वेळ घालवत आहे. परंतु, तो त्याच्या तयारीमध्ये कुठलीही कसर सोडत नाही आहे. ऑस्ट्रेलियाचा हा धडाकेबाज सलामीवीर त्याच्या हॉटेलच्या खोलीत फलंदाजीचा सराव करत आहे.
डावखुरा फलंदाज वॉर्नरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर त्याच्या हॉटेलच्या खोलीत शॅडो बॅटिंग करताना दिसत आहे. हॉटेलच्या खोलीत वॉर्नरच्या फलंदाजीचा सराव दाखवतो की तो आयपीएल २०२१ च्या उर्वरीत भागाबद्दल किती उत्साहित आहे.
वॉर्नरने या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘पाय हलवत ठेवावे लागतील आणि स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल. यानंतर मी मैदानावर येण्यास सज्ज असेल.’
https://www.instagram.com/p/CTrSMDSp3cx/
वॉर्नरला हॉटेलच्या खोलीत फलंदाजीचा सराव करताना पाहून त्याची पत्नी कॅंडिस वॉर्नरने एक गमतीदार कमेंट केली आहे. कॅंडिसने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, ‘मला तुला पुन्हा सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना बघायचे आहे, मी आता जास्त वाट पाहू शकत नाही.’
आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. सनरायझर्स हैदराबादची आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धात खराब कामगिरी झाली. संघाने सात सामन्यांत फक्त दोन गुण मिळवले आहेत आणि सध्या आठ संघांच्या गुणतालिकेच्या तळाशी आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ आहेत कसोटीत आठव्या क्रमांकावर दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारे ४ भारतीय फलंदाज
ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं ‘दीपवीर’सोबत घालवला क्वॉलिटी टाईम; अभिनेत्याने फोटो केला शेअर