भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी फुटबॉलचा मोठा चहाता आहे. लहानपणी तो त्याच्या शालेय संघाचा गोलकिपरही होता. त्यामुळे तो जेव्हाही संधी मिळेल तेव्हा फुटबॉल खेळण्याचा आनंद घेत असतो.
त्याने नुकतेच दर रविवारी होणाऱ्या सिनेमा सेलिब्रेटी फुटबॉल मॅचमध्ये 22 जुलैला सहभाग घेतला होता. या सामन्यामधील त्याचे आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या धडक या बॉलिवूड चित्रपटातील अभिनेता इशान खट्टरचे एकमेकांविरुद्ध खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाले आहेत.
यातील काही फोटोंमध्ये धोनी इशानला सल्ला देतानाही दिसत आहे.
तसेच इशान खट्टर हा या सामन्याचा नियमित सदस्य आहे. या सामन्याचे फोटो ऑल स्टार फुटबॉल क्लबनेही ट्विटरवर शेअर केले आहेत.
MSD 🏏+ #Football⚽ = #ASFC #Weekends done right!! 💥💥💥
.
.
.#Bollywood #Celebrities #PlayingForHumanity #Mumbai #AllStars #MSD #MSDhoni #Cricket #Legend pic.twitter.com/K0pgvdNF94— AllstarsFC_PFH (@AllstarsFC_PFH) July 23, 2018
धोनी आणि इशान व्यतिरिक्त या सामन्यात शशांक खेतान, बंटी वालिया, शब्बीर अहलूवालिया आणि सचिन जोशी हे देखील सहभागी झाले होते.
धोनी माजी केंद्रिय मंत्री प्रफुल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेलच्या लग्नासोहळ्यात सहभागी झाला होता. त्यानिमित्त तो मुंबईतच होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–बीसीसीआयचा हा पराक्रम युसूफ पठाणमुळे हुकला
–रोहीत शर्माच्या पत्नीचे युजवेंद्र चहलला सडेतोड उत्तर
–भारतीय क्रिकेट इतिहासात असे दुसऱ्यांदा घडले