महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे हा २०२१ च्या ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला पहिला धावपटू आहे. त्यातच आता त्याने पुन्हा एकदा त्याचा अभिमान वाटावा अशी कामगिरी नोंदवली आहे. त्याने पटीयाला येथे झालेल्या फेडरेशन चषक सिनियर राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले आहे.
त्याने पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये ८ मिनिट २०:२० सेकंद वेळ नोंदवत हे सुवर्णपदक जिंकले. यासह त्याने त्याचाच पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याने पूर्वी २०१९ साली दोहा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ८ मिनिटे २१:३७ सेकंद नोंदवली होती.
धनंजय मुंडेकडून कौतुकाची थाप
त्याच्या या कामगिरीचे कौतुक क्रीडामंत्री किरण रिजिजू आणि महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केले आहे. मुंडे यांनी त्याच्या कामगिरीबद्दल ट्विट केले आहे की ‘शाब्बास रे पठ्ठ्या! आमच्या बीडच्या अविनाश साबळेने तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. पटियाला फेडरेशन चषक राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत हे अंतर त्याने आठ मिनिटं २०.२० सेकंद वेळेत कापत सुवर्णपदक पटकावले! हा मुलगा ऑलीम्पिकमध्ये नाव काढणार हे नक्की!”
https://twitter.com/dhananjay_munde/status/1372390957006483457
तसेच त्यांनी त्याला राज्यसरकारकडून ऑलिंपिकसाठी पूर्ण पाठिंबा मिळेल असेही सांगितले आहे. त्यांनी दुसरे ट्विट केले की बीड “जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारा अविनाश आमचा अभिमान आहे. राज्य सरकारने अविनाशसह अन्य चार खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत पूर्वतयारीसाठी जानेवारी मध्ये दिलेली आहे. याउपर ऑलीम्पिकच्या त्याच्या ‘चेसिंग’ मध्ये राज्य सरकार त्याला काहीही कमी पडू देणार नाही.”
https://twitter.com/dhananjay_munde/status/1372428225972826112
याबरोबरच किरण रिजिजू यांनी कौतुक करताना ट्विट केले की “अविनाश साबळे आणखी एक राष्ट्रीय विक्रम नोंदवल्याबद्दल अभिनंदन. अविनाश यापूर्वीच टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने पटियाला येथे फेडरेशन कपमध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टिपलचेसमध्ये ८:२०:२० वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्याने त्याचाच ८:२१:३७ वेळेचा विक्रम मोडला आहे.”
https://twitter.com/KirenRijiju/status/1372181545612546049
ऑलिंपिकसाठी ठरला पात्र
अविनाशने २०१९ साली दोहा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत ८ मिनिटे २१:३७ सेकंद वेळ नोंदवली होती, त्याचवेळी तो टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरला होता. त्यामुळे सध्या त्याची ऑलिंपिकसाठी तयारी सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक; निर्णायक पाचव्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही
बॉक्सिंग जगताला मोठा धक्का! ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्विन हेगलरचे निधन
धक्कादायक! अनेक भारतीय धावपटूंच्या यशात मोलाचे योगदान देणारे प्रशिक्षक वसतिगृहात आढळले मृतावस्थेत






