---Advertisement---

बॉक्सिंग जगताला मोठा धक्का! ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेल्या मर्विन हेगलरचे निधन

On: सोमवार, मार्च 15, 2021 6:30 AM
---Advertisement---

मुक्केबाजीच्या इतिहासात ‘मार्वलस’ नावाने प्रसिद्ध असलेला मुक्केबाज मर्विन हेगलर याचे शनिवारी(१३ मार्च) निधन झाले आहे. त्याने वयाच्या ६६ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला आहे. याबाबतची माहिती, हेगलरची पत्नी केन हिने सोशल मीडिया मार्फत दिली आहे.

मर्विनच्या निधनानंतर त्याची पत्नी केनने फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने लिहले होते की, “मला माफ करा. मला एक दुःखद घोषणा करायची आहे. दुर्भाग्याने आज माझे पती मार्वलस मर्विस यांचे न्यू हैंपशर येथे राहत्या घरी निधन झाले आहे. या कठीण काळात आमचे कुटुंब विनंती करत आहे की तुम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान कराल.”

मार्वलस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुक्केबाजाने १९७३ पासून ते १९८७ पर्यंत मुक्केबाजी खेळात आपल्या नावाचा डंका वाजवला. आपल्या कारकीर्दीत त्याने एकूण ६७ सामने लढले. यात त्याने ६२ लढतींमध्ये विजय मिळवला. यांमधील ५२ सामने नॉक आऊट सामने होते .तर ३ सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच २ सामने ड्रॉ राहिले होते.

त्याचा १९८५ मध्ये सीजर्स पॅलेसमध्ये थॉमस हर्न्स विरुद्ध झालेला सामना आतापर्यंतचा सर्वोत्तम सामना आहे. हा सामना ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ रंगला होता. तसेच हेगलरने १९८० मध्ये वर्ल्ड बॉक्सिंग काउंसिल आणि वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशन मिडिलवेटचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्याने १९८३ मध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनचे विजेतेपद देखील पटकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

केवळ ४ धावांनी अर्धशतक हुकलेल्या जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग, पाहा व्हिडिओ

क्या बात अफगानिस्तान! क्रिकेटच्या इतिहासात केवळ ऑस्ट्रेलियालाच जमलेल्या त्या विक्रमाची केली बरोबरी

अर्धशतक करण्याआधी ‘या’ घटनेमुळे विराट कोहली झाला ट्रोल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---