अबुधाबी येथील शेख झायद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानी झिम्बाब्वेचा ६ गड्यांनी पराभव केला. याचबरोबर दोन सामन्यांची ही मालिका बरोबरीत सुटली. अफगाणिस्तानने या विजयासह नव्या विक्रमाला गवसणी घातली. विशेष म्हणजे त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकत ही कामगिरी केली.
अफगाणिस्तानचा शानदार विजय
अबुधाबी येथे उभय संघांमध्ये दुसरा कसोटी सामना १० मार्चपासून खेळवला गेला. अफगाणिस्तान ही आपल्या पहिल्या डावात हशमातुल्लाह शाहिदीच्या नाबाद शतकाच्या व कर्णधार असगर अफगाणच्या दीडशतकाच्या जोरावर ५४५ धावांचा डोंगर उभारला होता. झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात २८७ धावांवर बाद झाल्याने अफगाणिस्तानने त्यांना फॉलोऑन दिला. झिंबाब्वेच्या दुसऱ्या डावात कर्णधार सीन विल्यम्सने दिडशतक झळकावून डावाने पराभवाची नामुष्की टळली. विजयासाठी मिळालेले १०८ धावांचे आव्हान अफगानिस्तानने चार गड्यांच्या मोबदल्यात गाठले.
अफगाणिस्तान पोचला अव्वलस्थानी
या विजयासह अफगाणिस्तानने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली. कोणत्याही देशाने खेळलेल्या पहिल्या सहा कसोटी सामन्यात सर्वाधिक तीन विजय हे अफगाणिस्तानने मिळवले आहेत. अफगाणिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात प्रत्येकी तीन विजय व तीन पराभव स्वीकारले असून, यापूर्वी अशी कामगिरी केवळ ऑस्ट्रेलियन संघाने केली होती. केवळ ऑस्ट्रेलियालाच त्यांच्या पहिल्या ६ कसोटी सामन्यातील ३ सामने जिंकता आले होते.
त्यानंतर, पहिल्या ६ कसोटी सामन्यात इंग्लंडने दोन तर पाकिस्तान व वेस्ट इंडीजने प्रत्येकी एक विजय साकारला होता. इतर कोणताही संघ आपल्या पहिल्या सहा सामन्यात एकही विजय मिळवू शकला नव्हता.
अशी राहिली आहे अफगाणिस्तानचे कामगिरी
अफगाणिस्तानने २०१८ मध्ये बेंगलोर येथे भारताविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अवघ्या दोन दिवसात हा सामना आपल्या नावे केला होता. त्यानंतर आयर्लंड व बांगलादेशविरुद्ध त्यांनी विजय मिळवलेला. मात्र, मागील वर्षी वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला. आता, झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत प्रत्येकी एक पराभव व एक विजय त्यांनी मिळवलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्धशतक करण्याआधी ‘या’ घटनेमुळे विराट कोहली झाला ट्रोल, पाहा व्हिडिओ
रिटर्न ऑफ किंग कोहली! विराटचं होतंय जोरदार कौतुक, पाहा खास प्रतिक्रिया
कोहली दिसले पुन्हा’विराट’रुप, ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसराच कर्णधार