---Advertisement---

रिटर्न ऑफ किंग कोहली! विराटचं होतंय जोरदार कौतुक, पाहा खास प्रतिक्रिया

---Advertisement---

अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडचा ७ गडी राखून सहज पराभव केला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आणली. या सामन्यात भारतातर्फे कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७३ धावांची खेळी केली. या खेळीनंतर अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

विराटने खेळली शानदार खेळी
अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १६५ धावांचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर टीकेला सामोरा गेलेला कर्णधार विराट कोहली या सामन्यात चमकला. त्याने ५ चौकार व ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

याच खेळी दरम्यान विराटने कर्णधार म्हणून १२,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. तसेच, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ३००० धावांचा टप्पाही त्याने गाठला. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.

माजी खेळाडूंनी केले कौतुक
मागील काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीने या सामन्यात ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळत विजय साकारला. त्यानंतर, अनेक माजी खेळाडूंनी ट्विटरवरून त्याचे कौतुक केले. भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने विराटचे एक छायाचित्र शेअर करताना, ‘द रिटर्न ऑफ किंग’ असे लिहिले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंग्लंड लिजेंड्सचे नेतृत्व करणाऱ्या केविन पीटरसनने ट्विट करताना लिहिले, ‘आपल्या संघाला विजय मिळवून देताना धावांचा पाठलाग करत आणखी एक नाबाद खेळी’ यासोबत त्याने सांकेतिक भाषेत शेळीची इमोजी वापरत ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (गोट)’ म्हणजे सर्वकालिक सर्वोत्तम असे म्हटले आहे.

https://twitter.com/KP24/status/1371146026589974530

भारतीय संघाचे माजी कर्णधार व माजी निवडकर्ता कृष्णम्माचारी श्रीकांत यांनीदेखील ट्विट करून विराटचे कौतुक केले. त्यांनी सिंहाचे एक छायाचित्र शेअर करत लिहिले, ‘रिटर्न ऑफ किंग कोहली! फॉर्म हा तात्पुरता असतो, मात्र दर्जा कायमचा. सर्व विभागात पुढे होऊन त्याने जबाबदारी स्वीकारली.’

या माजी खेळाडूंसह अनेक क्रिकेट चाहत्यांनी देखील सोशल मीडियावरून विराटवर कौतुकाचा वर्षाव केला.

https://twitter.com/ViratFanTrends/status/1371142438937489413

https://twitter.com/_masterofchase_/status/1371145781156048900

https://twitter.com/anildarla9/status/1371169560020193281

https://twitter.com/nishant22offic1/status/1371169195019231242

आता भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा टी२० सामना मंगळवारी (१६ मार्च) होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहली दिसले पुन्हा’विराट’रुप, ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसराच कर्णधार

विजयी षटकार ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास! ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---