---Advertisement---

विजयी षटकार ठोकत विराट कोहलीने रचला इतिहास! ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर

On: रविवार, मार्च 14, 2021 11:08 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी (१४ मार्च) दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या विजयात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक इतिहास रचला आहे.

विराटने विजयी षटकार ठोकत विश्वविक्रमाला घातली गवसणी

या सामन्यात इंग्लंडने भारताला १६५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने १८ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह त्याने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत नाबाद ७३ धावा केल्या.

याबरोबरच विराटने हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला. हा टप्पा पार करणारा तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला. याआधी असा कारनामा कोणालाही करता आला नव्हता.

विराटच्या आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ८७ सामन्यात ५०.८६ च्या सरासरीने ३००१ धावा झाल्या आहेत. यात त्याच्या २६ अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 
३००१ धावा – विराट कोहली (८७ सामने)
२८३९ धावा – मार्टिन गप्टील (९९ सामने)
२७७३ धावा – रोहित शर्मा (१०८ सामने)
२३४६ धावा – ऍरॉन फिंच (७१ सामने)
२३३५ धावा – शोएब मलिक (११६ सामने)

इशान किशनसह अर्धशतकी भागीदारी 

भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात सलामीवीर केएल राहुलची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. मात्र त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इशान किशनने डाव सांभाळताना अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी इशान ५६ धावांवर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तुटली. पण पुढे विराटने आक्रमक खेळ कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच भारताला षटकात १६५ धावांचा आव्हान पूर्ण करुन देत भारताला विजय मिळवून दिला.

इंग्लंडच्या १६४ धावा

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार ओएन मॉर्गनने २८ धावांची खेळी केली. तर डेव्हिड मलान(२४), बेन स्टोक्स(२४) आणि जॉनी बेअरस्टो (२०) यांनी छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय

Video: अरेरे, भावा चेंडू तरी नीट पकडायचा! बेन स्टोक्सने ‘असा’ सोडला इशानचा सोपा झेल

इशान किशन, सुर्यकुमारच्या पदार्पणामुळे झाला खास विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारी पहिलीच भारतीय जोडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---