---Advertisement---

काय सांगता, वनडे सामन्यांची संख्या आणखी कमी होणार? आयसीसी नव्या जागतिक टी 20 लीग स्पर्धेच्या विचारात

On: रविवार, जुलै 5, 2026 6:01 PM
---Advertisement---

मागील काही वर्षांत क्रिकेटमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. आता त्यामध्ये आणखी बदल होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) वेळापत्रकात मोठे बदल करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. त्यांनी सुचवलेले प्रस्तान लागू झाले तर, वनडे क्रिकेट सामन्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते.

आयसीसी जगभरातील फ्रॅंचायझी संघांसाठी एक नवीन टी २० स्पर्धा सुरू करू शकते. तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशीप (WTC) या स्पर्धेचीही व्याप्ती वाढवण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे होणाऱ्या आयसीसी वार्षिक सर्वसाधारण सभेत या प्रस्तावांवर चर्चा केली जाईल. ही बैठक आयसीसीच्या सर्व १२ राष्ट्रांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

आयसीसीच्या पुढील योजनांचा आराखडा हा एका धोराणात्मक आढाव्याचा भाग आहे, जो अमेरिकन सल्लागार कंपनी मॅकिन्सेद्वारे तयार केला जात आहे. कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारांचे भविष्य अधिक मजबूत करणे, हाच यामागचा उद्देश आहे.

वनडे क्रिकेट अधिक रोमांचक आणि आकर्षक बनवण्यासाठी आयसीसी या फॉरमॅटचा कालावधी कमी करण्याच्या विचारात आहे. मागील काही वर्षांपासून टी २० क्रिकेटला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे वनडे सामन्यांचा आधीसारखा प्रेक्षकवर्ग लाभत नाहीये. त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत नेहमी प्रश्न उपस्थित केले जातात.

या अहवालात असेही म्हटले आहे की, भविष्यात वनडे विश्वचषकापूर्वीच्या अंदाजे १८ महिन्यांतच वनडे क्रिकेटला प्राधान्य दिले जाऊ शकते. त्यामुळे विश्वचषकांमधील वर्षांमध्ये वनडे सामन्यांची संख्या लक्षणरित्या कमी केली जाऊ शकते.

जागतिक फ्रॅंचायजी टी २० स्पर्धा?
आयसीसी जागतिक फ्रॅंचायजी टी २० स्पर्धा आयोजनाच्या विचारात आहे. ही स्पर्धा आधीच्या चॅम्पियन्स लीग टी २० सारखी असेल, ज्यामध्ये विविध देशांमधील प्रमुख टी २० लीगमधील सर्वोत्तम संघ सहभागी होईल.

२०२८ च्या लॉस एजेंलिस ऑलिम्पिकच्या पार्श्वभुमीवर लहान स्वरुपाच्या क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याच्या विचारात आयसीसी आहे. (ICC is considering ODI matches tobe reduced further and a new global T20 tournament)

अलीकडेच भारताचा दिग्गज आर अश्विनने वनडे क्रिकेटच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तो म्हणाला, “जर खेळाला जागतिक व्हायचे असेल आणि त्याला ऑलिम्पिकचा दर्जा मिळवायचा असेल, तर खेळ जेवढा लहान तेवढे तो अधिक व्यवहार्य ठरेल. आणि अशाप्रकारेच तो अधिक मोठा होईल. एक एक खेळ म्हणून टी २० क्रिकेट टिकून राहिल. वनडे क्रिकेटबद्दल मात्र मला फारशी खात्री नाही.”

त्याचबरोबर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा विस्तार करण्याच्याही विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. २०२७-२९ पासून या स्पर्धेतील संघांची संख्या १२ केली जाऊ शकते. यामुळे आयर्लंड, झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान हे संघदेखील या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतात. सध्या ही स्पर्धा केवळ ९ संघांमध्येच खेळली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---