---Advertisement---

ENG vs IND: रवी बिश्नोईच्या उजव्या पायाचा त्रास! सुधारणा नाही झाली तर टीम इंडिया हरतच…

On: रविवार, जुलै 5, 2026 2:07 PM
---Advertisement---

भारताच्या इंग्लंड दौऱ्याची सुरूवात काही खास झाली नाही. टी २० मालिकेने सुरू झालेल्या या दौऱ्यात भारताला शनिवारी (४ जुलै) पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या टी २० सामन्यात झालेल्या या पराभवामागचे कारण फिरकीपटू रवी बिश्नोईची कामगिरी ठरली. त्याने अनेकदा चुका केल्या आणि ज्यामुळे भारताचे नुकसान झाले.

मॅंचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या या दुसऱ्या टी २० सामन्यात भारत ४ विकेट्सने पराभूत झाला. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने धमाकेदार विजय मिळवला असला तरी अधिक चर्चा बिश्नोईच्या कामगिरीची सुरू आहे. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट न घेता ६० धावा दिल्या. त्याच्या या निराशाजनक कामगिरीबरोबर त्याच्या नो-बॉल्सचीच चर्चा अधिक होत आहे.

बिश्नोईने या सामन्यात एक नाही दोन नाही, तर तीन नो-बॉल्स टाकले, ज्यांना क्रिकेटच्या भाषेत ‘साईड नो-बॉल्स’ म्हणतात. त्याने इंग्लंडच्या डावातील १७ वे षटक टाकले, तेव्हा यजमान संघाला २४ चेंडूंमध्ये विजयासाठी ४९ धावांची आवश्यकता होती. त्यामुळे सामना भारताच्या पारड्यात असल्याचे जाणावले, मात्र याच षटकात बिश्नोईने सलग दोन चुका केल्या.

बिश्नोईने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पहिली चूक केले. चेंडू टाकल्यानंतर टीव्ही पंचांनी रिव्ह्यू घेतल्यानंतर त्याचा मागचा पाय रिटर्न क्रीज ची पांढरी रेष ओलांडून गेला असल्याचे दिसले आणि त्याला नो-बॉल घोषित केले. त्यानंतर फॉर्ममध्ये असलेल्या जेकब बेथेलने त्यावर षटकार मारला.

पहिल्याच धक्क्यातून सावरत असताना, बिश्नोईने पुन्हा एक नो-बॉल टाकला. त्याचा मागचा पाय रिटर्न क्रीज ची पांढरी रेष ओलांडून गेला असल्याचे दिसले आणि पंचांनी त्यालाही साईड नो-बॉल घोषित केला. बेथेलने त्यावर आणखी एक षटकार मारला. त्यामुळे इंग्लंडवरील दबाव पूर्णपणे कमी झाला. कारण त्यानंतर इंग्लंडला १८ चेंडूंमध्ये केवळ २० धावा पाहिजे होत्या. ते लक्ष्य त्यांनी सहज गाठले.

साईड नो बॉल म्हणजे काय?
क्रिकेटमध्ये अनेकांना फ्रंट फूट नो बॉल माहित असतो, जो गोलंदाजाचा पाय क्रीजच्या पांढऱ्या रेषेच्या बाहेर गेल्यास दिला जातो. या सामन्यात मात्र बिश्नोईची चूक बॅक फूट आणि क्रीजच्या बाजूच्या रेषेशी संबंधित होता. त्याला साईड नो बॉल म्हटले जाते.

गोलंदाजी करताना, त्या खेळाडूचा मागचा पाय खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पांढऱ्या रेषेच्या पूर्णपणे आत पाहिजे. पायाचा कोणताही भाग त्या रेषेला स्पर्श करू नये किंवा त्याच्यापलीकडे गेला नाही पाहिजे.

या सामन्यात बिश्नोईने तीन साईड नो बॉल टाकत सर्वांना चकित केले. यावरून त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शन आणि रन-अपमध्ये समस्या असल्याचे दिसते. यावर लवकरच उपाय शोधावा लागेल, अन्यथा भारताला ते महागात पडू शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---