रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मंगळवारी (०५ एप्रिल) आयपीएलच्या १५व्या हंगामातील १३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ४ विकेट्सने विजय मिळवला. वानखेडेवर झालेल्या या सामन्यात युझवेंद्र चहलने शानदार गोलंदाजी केली. त्याने बेंगलोरच्या २ दिग्गज खेळाडूंना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. चहलच्या फिरकीसमोर त्याच्या माजी संघातील खेळाडूंचा टिकाव लागला नाही. चहलने घेतलेल्या या विकेट्सनंतर मैदानात उपस्थित असलेली त्याची पत्नी धनश्री वर्माही खुश झाली. यादरम्यानचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
चहलने ४ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १५ धावा दिल्या. या दरम्यान त्याने २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने पहिली विकेट बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) घेतली. त्यानंतर त्याने डेविड विलीला तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर विराट कोहलीलाही धावबाद करण्यात मोलाचा वाटा उचलला.
धनश्रीचा व्हिडिओ
यादरम्यान त्याने डेविड विलीला जसे बाद केले, तसे स्टेडिअममध्ये उपस्थित त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma Dance Video) आनंदी दिसली. यादरम्यानचा तिचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चहलच्या गोलंदाजीनंतरही राजस्थान संघाला ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
https://twitter.com/AmitMovieHolic/status/1511550874476167170?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1511550874476167170%7Ctwgr%5Ehb_1_10%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fiplt20%2Fnews%2Fwatch-video-dhanashree-verma-celebration-video-went-viral-after-yuzvendra-chahal-took-2-wickets-against-royal-challengers-bangalore%2Farticleshow%2F90681270.cms
सामन्याचा आढावा
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या. राजस्थानने दिलेले १७० धावांचे आव्हान बेंगलोर संघाने १९.१ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केले. यावेळी दिनेश कार्तिक (४४ धावा) (Dinesh Karthik) आणि शाहबाज अहमदने (४५ धावा) (Shahbaz Ahmed) आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला पराभवाच्या तोंडातून बाहेर काढत सामना जिंकण्यात मोलाचे योगदान दिले.
राजस्थानने आयपीएलमध्ये सलग २ सामन्यात विजय मिळवला होता. मात्र, त्यांना बेंगलोरविरुद्ध पहिला पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा आणि आर अश्विन खूपच महागडे ठरले. कृष्णाने ४ षटकात ४० धावा, तर अश्विनने ३९ धावा दिल्या. या दोन्ही गोलंदाजांना एकही विकेट चटकावता आली नाही.