नुकताच अमेरिकन विनोदी कार्यक्रम ‘फ्रेंड्स: द रियुनियन’ चा अधिकृत ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतीय नेटकरी देखील याबद्दल खूप उत्सुकता दर्शवत आहेत आणि अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही या कॉमेडी शोचा ट्रेलर इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. पण यासाठी पत्नी धनश्रीने त्याला ट्रोल केले आहे. या घटनेचा मजेशीर व्हिडिओ समोर आला असून, अनेकांना तो फारच विनोदी जाणवत आहे.
धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चहलचा एका व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती चहलला विचारत आहे की, ‘तू कॉमेडी शो फ्रेंड्सचा ट्रेलर शेअर केला आहे. पण तू याचा एक भाग देखील पाहिला आहे का?’ प्रत्युत्तरात चहल म्हणाला की हो, त्याने संपूर्ण कार्यक्रम पाहिला आहे. पण चहल खोटे बोलत आहे हे समजण्यास धनश्रीला जास्त वेळ लागला नाही. तr लगेच म्हणाली की तू काहीही बघितले नाही.
धनश्रीने व्हिडिओमध्ये पुढे खुलासा केला की ती चहलला फ्रेंड्स बघण्याचे कायम सांगत असे आणि आता त्याने या शोबद्दल इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. धनश्री चहलच्या चेहऱ्यावर कॅमेरा झूम करत म्हणाली की, हाच तो चेहरा आहे जो फ्रेंड्स शोची स्टोरी शेयर करत आहे, पण त्याचा एकही भाग पाहिलेला नाही. तिने चहलला या शोच्या 4 पात्रांची नावे सांगण्यास सांगितले. यावर चहल म्हणाला की, मित्रांची नावे नसतात.
धनश्री व चहल मधील या मजेशीर संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात वायरल होत असून, नेटकरी देखील त्याला फार पसंद करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओ बद्दल मजेशीर कमेंट्स केलेल्या आहेत.
धनश्रीने अलीकडेच चहलचा आयपीएल संघ आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची जर्सी घालून डान्सचा एक व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओवरून मात्र तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. एका चाहत्याने लिहिले की, धनश्री आता आयपीएल संपलेले आहे. त्याचवेळी एका चाहत्याने विचारले की, ही चहलची जर्सी आहे का?
चहल आयपीएल 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कडून सर्व 7 सामने खेळला होता. यादरम्यान संघाने शानदार कामगिरी केली, पण चहलला काही विशेष करता आली नाही. चहलने आयपीएल 2021 मधील 7 सामन्यांत 4 गडी बाद केले होते. दरम्यान आगामी काळात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून, चहलकडे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शानदार कामगिरी करण्याची मोठी संधी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मॅराडोना यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हेतर हत्या? जवळच्या लोकांवर संशय
‘या’ भारतीय क्रिकेटपटूची कमाल; टी१० सामन्यांत एकाच षटकात ठोकले सलग ६ षटकार