एकाच षटकात ६ षटाकर ठोकणे ही क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट मानली जाते. पण असे असले तरी काही असे क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी हा कारनामा केला आहे. भारताच्या युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे. आता आणखी एका भारतीय क्रिकेटपटूला असा कारनामा करण्यात यश आले आहे.
युरोपियन क्रिकेट सिरीजमध्ये 21 मे रोजी, बायर उर्डिनजेन बूस्टर आणि कोलन चॅलेंजर्स यांच्यात टी10 क्रिकेट सामना खेळला गेला, ज्यामध्ये अरिथरन वसेकरन या भारतीय खेळाडूने शानदार कामगिरी केली. या 34 वर्षीय फलंदाजाने एकाच षटकातील सर्व चेंडूंवर षटकार ठोकत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे.
कोलन चॅलेंजर्सविरुद्ध डावाच्या पाचव्या षटकात वसिकरनने हे कामगिरी केली. या दरम्यान त्याने गोलंदाजीसाठी आलेल्या आयुष शर्माच्या सर्व 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले. यासोबतच अरिथन वाशीकरनने षटकात 6 षटकार ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत आपले नाव जोडले आहे. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच मेजर क्लब्स टूर्नामेंटमध्ये श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज थिसारा परेराने षटकातील सर्व 6 चेंडूंवर षटकार ठोकले होते.
दरम्यान सामन्याबद्दल विचार केला असता, प्रथम फलंदाजी करताना बूस्टरने 8 गडी गमावत 115 धावा केल्या होत्या. यात वसीकरनने 25 चेंडूत 7 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या तर श्रीकांत वाकाने 16 धावांची खेळी केली. मुथुसुब्रह्मण्यम, गुरुमूर्ती आणि नरेशकुमार यांनी आपल्या संघासाठी 2-2 बळी मिळवले.
प्रत्युत्तरात,चॅलेंजर्सचा संघ निर्धारित षटकात 6 गडी गमावून केवळ 63 धावाच करू शकला. संघासाठी श्रीनिवास नरेशकुमारनने सर्वाधिक 22 धावा केल्या, तर अखिलने 10 धावांची खेळी केली. बुस्टरकडून प्रभा, रझाकुलसिंगम यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. यासह बूस्टरने सामना 52 धावांनी आपल्या नावे केला.
क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार ठोकणारे फलंदाज:
गारफील्ड सोबर्स (प्रथम श्रेणी क्रिकेट) 1968
रवी शास्त्री (प्रथम श्रेणी क्रिकेट) 1985
हर्षल गिब्स (आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ) 2007
युवराज सिंग (आंतरराष्ट्रीय टी-20 सामना) 2007
रॉस व्हाइटली (टी 20 सामना) 2017
हजरतुल्ला जाझाई (टी 20 सामना) 2018
लिओ कार्टर (टी 20 सामना) 2020
कायरन पोलार्ड (आंतरराष्ट्रीय टी 20 सामना ) 2021
थिसारा परेरा (प्रथम श्रेणी क्रिकेट सामना) 2021
महत्त्वाच्या बातम्या –
‘धवन श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार असावा’, युवा वेगवान गोलंदाजाने कारणासहीत केली शिफारस
चेन्नई सुपर किंग्ज याच दिवशी ४ वर्षांपुर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे पडली
जेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूचे वनडे द्विशतकाचे स्वप्न भंगले होते सचिन तेंडूलकरमुळे