हिमाचल क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला, जे हिमालयाच्या कुशीत वसलेले सर्वात उंच क्रिकेट मैदान आहे, ते आपला पहिला कसोटी सामन्याच आयोजन उद्या अर्थात २५ मार्च रोजी करत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका १-१ अश्या बरोबरीत असून या सामन्याकडे फायनल म्हणूनच पहिले जात आहे. पुणे, बंगलोर आणि रांची येथील कसोटी सामन्यानंतर धरमशाला येथे चौथा कसोटी सामना होत आहे.
वादांमुळे बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका आधीच गाजलेली आहे. त्यात अंतिम सामना म्हणून या कसोटीकडे पाहिलं जात असल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सॅन २०१४-१५ पासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. जर भारत चौथा सामना जिंकला तर आणि तरच ती ट्रॉफी भारताकडे येईल.
बक्षीस भारतालाच
भारत सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. भारत हि कसोटी जरी हरला तरी १ एप्रिल पर्यंत पहिल्या स्थानावर राहील. आणि आयसीसी कडून देण्यात येणारी एक मिलियन डॉलर बक्षीस रक्कम भारताला मिळेल. जर ही कसोटी ऑस्ट्रेलिया हारली आणि आफ्रिका न्यूजीलँड विरुद्ध जिंकली तर ऑस्ट्रेलियाला आपला दुसरा क्रमांक गमवावा लागेल आणि दुसऱ्या क्रमकांसाठीची बक्षीसाची रक्कमही.
मुंबईकर श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त कोहलीसाठी बॅकअप पर्याय म्हणून धरमशालामध्ये दाखल
रांची कसोटी मध्ये खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विराट कोहली चौथ्या सामन्यात खेळेल किंवा नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्वतः विराटनेच म्हटले आहे कि जर १०० टक्के तंदुरुस्त नसेल तर तो हा सामना खेळणार नाही. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत कोहलीच्या खेळण्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. देशांतर्गत सामन्यांमध्ये गेली तीन वर्ष जबदस्त कामगिरी करणाऱ्या २२ वर्षीय श्रेयस अय्यरला कोहलीसाठी बॅकअप पर्याय म्हणून धरमशालाला तातडीने बोलवून घेण्यात आले आहे.
संभाव्य भारतीय संघ
१. मुरली विजय २.केएल राहुल ३. चेतेश्वर पुजारा ४. श्रेयस अय्यर/ विराट कोहली(कर्णधार) ५.अजिंक्य रहाणे ६.करून नायर/जयंत यादव ७.वृद्धिमान सहा(यष्टीरक्षक) ८.आर अश्विन ९. रवींद्र जडेजा १०. इशांत शर्मा/ भुवनेश्वर कुमार ११. उमेश यादव
संभाव्य ऑस्ट्रेलियन संघ
१. डेविड वॉर्नर २.केमॅट रेनशॉ ३. शॉन मार्श ४. स्टिव्ह स्मिथ (कर्णधार) ५.पिट हॅंड्सकोम्ब ६.ग्लेन मॅक्सवेल ७.मेथथू वेड (यष्टीरक्षक) ८.पॅट कमिन्स ९. स्टिव्ह ओकिफ/ जॅक्सन बर्ड १०. जोश हेझलवूड ११. नॅथन लायन