आयपीएल 2021 स्पर्धा खऱ्या अर्थाने रेकॉर्ड ब्रेकिंग ठरत आहे. या मोसमात असे अनेक विक्रम झाले आहेत ज्यांची कल्पना मागील काही वर्षात करणे अवघड होती. नुकत्याच शनिवारी (1 मे) पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज मधील सामन्यात देखील एक अनोखा विक्रम प्रस्थापित झाला आहे.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या अंतिम 11 मध्ये स्थान मिळताच वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने आपल्या नावे एक खास विक्रम केला. धवल आयपीएल इतिहासात सलग 14 हंगामात किमान एकतरी सामना खेळणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही वेगवान गोलंदाजाला असा कारनामा करता आलेला नाही. विशेष म्हणजे धवलने 2008 साली मुंबई संघाकडूनच आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात चेन्नईविरुद्ध केली होती. यानंतर तो राजस्थान रॉयल्स व गुजरात लायन्स संघाकडून देखील खेळला आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यातील धवलच्या कामगिरीचा विचार केला असता त्याने 4 षटकात एकही बळी न मिळवता 48 धावा खर्च केल्या. मात्र मुंबई संघाने विजय मिळवल्याने सांघिक दृष्ट्या हा सामना धवलसाठी फारच समाधानकारक ठरला.
दरम्यान, सामन्याचा विचार केला असता मोईन अली, अंबाती रायडू व फाफ डू प्लेसिसच्या शानदार अर्धशतकीय खेळीच्या बळावर चेन्नईला निर्धारित 20 षटकात 4 बाद 218 धावांची डोंगरा एवढी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. मात्र मुंबईकडून कायरन पोलार्डच्या वादळी खेळीने चेन्नईच्या विजयाच्या आशेवर पाणी फेरले व मुंबईने शेवटच्या चेंडूवर 219 धावांचे आव्हान पूर्ण करत विजय मिळवला. पोलार्डला नाबाद 87 धावांची खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजीत 2 बळी देखील मिळवले. त्यामुळे त्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मॅचविनर’ पोलार्डच्या ‘त्या’ ८ गगनभेदी षटकारांची मेजवानी, पाहा व्हिडिओ
पोलार्ड पॉवर! धमाकेदार खेळी करत ठोकले आयपीएल २०२१ मधील वेगवान अर्धशतक
रायुडूची भर मैदानात तोडफोड, नक्की झाल काय? पाहा व्हिडिओ