वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या मालिकेसाठी प्रभारी कर्णधार असलेल्या अनुभवी सलामीवीर शिखर धवनने ही संधी साधली. पोर्ट ऑफ स्पेन येथील या सामन्यात त्याने शानदार अर्धशतककी खेळी करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. त्याचबरोबर मोठ्या अवधीनंतर वनडे संघात पुनरागमन केलेल्या शुबमन गिलनेही अर्धशतक झळकावले. आपल्या खेळ्यांदरम्यान त्यांनी भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढले.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने घेतला होता. त्याचा हा निर्णय शिखर धवन व शुबमन गिल यांनी चुकीचा ठरवला. दोघांनी यजमान गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. त्यांनी १७.४ षटकात ११९ धावांची सलामी दिली. गिल ६४ धावा करून धावबाद झाला. शिखरने त्यानंतरही विरोधी गोलंदाजांवर आक्रमण करणे सुरू ठेवले. त्याने याच दरम्यान आपल्या वनडे कारकिर्दीतील १८ वे शतक पूर्ण करण्याची संधी त्याच्याकडे होती. मात्र, तो ९७ धावांवर बाद झाला.
शिखरने या खेळीदरम्यान आपल्या १५० व्या वनडे डावात ५३ व्या वेळी ५० पेक्षा जास्त धावांची खेळी केली. याबाबतीत त्याच्यापुढे केवळ विराट कोहली हाच आहे. विराटने आपल्या पहिल्या १५० डावात ५४ वेळा अशी कामगिरी केलेली. सलामीवीर म्हणून शिखरने ५३ व्या वेळी ५०+ धावा केल्या. याबाबतीत त्याने दिग्गज सचिन तेंडुलकरची बरोबरी केली.
दुसरीकडे, शुबमन गिलनेही अर्धशतक झळकावले. यादरम्यान त्याने सचिनला मागे टाकत वेस्ट इंडीजमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला. सचिनने २४ वर्ष व ३ दिवस इतके वय असताना अर्धशतक ठोकले होते. त्याला मागे टाकत आता गिलने २२ वर्ष व ३१७ दिवस या वयात अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘शार्दुल ठाकुरकडे हार्दिक पंड्याएवढी क्षमता नाहीये…’, माजी दिग्गजाची प्रतिक्रिया चर्चेत
सारा-अर्जुनने रिक्रिएट केलं सर्किट-मुन्नाभाई, फोटो झालेत व्हायरल
किती हे क्रिकेट? टी२० विश्वचषकाआधी टीम इंडिया खेळणार दोन नव्या मालिका; असा आहे कार्यक्रम