पल्लेकेल: भारताचा सलामीवीर शिखर धवनने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना जबरदस्त शतकी खेळी केली. या खेळीत त्याने १२३ चेंडूत ११९ धावांची खेळी केली. यात त्याने तब्बल ६८ धावा या फक्त चौकारांच्या साहाय्याने जमवल्या.
शिखर धवनची ही मालिकेतील दुसरी शतकी खेळी होती. परदेशी भूमीवर भारतीय सलामीवीराने एकाच कसोटी मालिकेत दोन शतकी खेळी करण्याची ही २०११ नंतरची ही केवळ दुसरी वेळ होती.
२०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध सलामीवीराची भूमिका पार पडताना राहुल द्रविडने दोन शतकी खेळी केल्या होत्या. आजपर्यंत भारताकडून परदेशी भूमीत कसोटी मालिकेत दोन वेळा शतकी खेळी करण्याचा योग तब्बल ५ वेळा तर राहुल द्रविडकडून २ वेळा आला आहे.
भारतीय सलामीवीर ज्यांनी केल्या परदेशी भूमीवर कसोटी मालिकेत दोन शतकी खेळी
१ विनू मंकड
५ सुनील गावसकर
१ रवी शास्त्री
२ राहुल द्रविड
१ गौतम गंभीर
१ वीरेंद्र सेहवाग
१ शिखर धवन