राजकोट। आज(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने दमदार सुरुवात करुन दिली आहे.
त्यांनी 81 धावांची सलामी भागीदारी रचली. मात्र रोहित 42 धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर शिखरने कर्णधार विराट कोहलीला साथीला घेत भारताच्या डावाला आकार दिला. पण शिखरला 96 धावांवर असताना केन रिचर्डसनने बाद केले. शिखरचा झेल मिशेल स्टार्कने घेतला.
शिखरने 90 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकारांसह 96 धावा केल्या. मात्र त्याचे 18 वे वनडे शतक केवळ 4 धावांनी हुकले.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यातही शिखर धवनचे शतक केवळ 26 धावांनी हुकले होते. तो 74 धावांवर बाद झाला होता.
धवनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत खेळताना मागील 5 सामन्यांमध्ये चौथ्यांदा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये 143 आणि 117 धावांच्या दोन शतकी खेळींचाही समावेश आहे. तर दोन वेळा त्याचे शतक थोडक्यात हुकले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मागील 5 वनडे सामन्यातील धवनच्या धावा –
143 धावा – मोहाली, 10 मार्च 2019
12 धावा – दिल्ली, 13 मार्च 2019
117 धावा – द ओव्हल, 9 जून 2019
74 धावा – मुंबई, 14 जानेवारी 2020
96 धावा – राजकोट, 17 जानेवारी 2020
https://twitter.com/Maha_Sports/status/1218123845426499585
https://twitter.com/Maha_Sports/status/1218104821867139072