आयपीएलच्या 17व्या हंगामाला आता काही तासाचा अवधी शिल्लक आहे. तसेच यंदाच्या हंगामात सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. मात्र त्याआधी आयपीएल 2024 मध्ये मोठी उलथा पालत झालेली पहायला मिळालं आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सप्रमाणे चेन्नई सुपर किंग्सने आपला कर्णधार बदलला आहे.
याबरोबरच पहिल्या सामन्याआधी ट्रॉफीसोबत सर्व टीमच्या कर्णधारांचे फोटोशूट करण्यात आले होते. यावेळी महेंद्र सिंग धोनी आणि शिखर धवन हे दोघेही दिसले नाहीत. पण त्याआधीच धोनीने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवल्याचं सीएसकेच्या ऑफिशिअल हँडलवरुन स्पष्ट करण्यात आलं होतं. पण मग पंजाबचा कर्णधार शिखर धवन देखील दिसला नाही, म्हणून सोशल मिडियावर चर्चेनां ऊधाण आलं होतं.
पण शिखर धवनबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नव्हती, तसेच त्याच्या टीमकडून जितेश शर्मा उपकर्णधार आहे, त्यामुळे तो फोटोशूटमध्ये सहभागी झाला होता. अशा प्रकारे जितेश शर्मा याला नवीन जबाबदारी मिळाली आहे. मागील सीजनमध्ये सॅम करन पंजाब किंग्जचा उपकर्णधार होता. याबरोबरच जितेश शर्माने गेल्या वर्षी पंजाब किंग्ज संघासाठी चांगली कामगिरी केली होती. यानंतर त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
𝐈𝐭'𝐬 𝐒𝐡𝐨𝐰𝐓𝐢𝐦𝐞!
The #TATAIPL is here and WE are ready to ROCK & ROLL 🎉🥳🥁
Presenting the 9 captains with PBKS being represented by vice-captain Jitesh Sharma. pic.twitter.com/v3fyo95cWI
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2024
दरम्यान जितेश शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळले असून त्यात त्याने 543 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 25.86 आहे आणि तो 159.24 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. जर आपण T20 आंतरराष्ट्रीय आकडेवारीबद्दल बोललो तर त्याने 9 सामने खेळून 100 धावा केल्या आहेत. येथे त्याची सरासरी 14.29 आहे आणि स्ट्राइक रेट 147.06 आहे.
अशातच पंजाब किंग्ज 17 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात एकूण 4 सामने खेळणार आहे. तसेच पंजाब किंग्स या 4 पैकी एक सामना हा आपल्या घरच्या मैदानात अर्थात मोहालीत खेळणार आहे.
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स , 23 मार्च, मोहाली
पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 25 मार्च, बंगळुरु
पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 30 मार्च, लखनऊ
पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, 4 एप्रिल, अहमदाबाद
आयपीएल 2024 साठी पंजाब किंग्सचा संघ पुढीलप्रमाणे :- शिखर धवन (कर्णधार), जितेश शर्मा (उपकर्णधार) मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंह, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिविंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, सॅम करन, कगिसो रबाडा, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर, हरप्रीत भाटिया, विदवथ कावेरप्पा, शिवम सिंह, हर्षल पटेल, क्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंह, तनय त्यागराजन, प्रिंस चौधरी आणि राइली रूसो.
महत्त्वाच्या बातम्या-
- चॅम्पियन्स युगाचा अंत! ना धोनी.. ना रोहित.. ना विराट, युवा खेळाडू बनले आयपीएल संघांचे कॅप्टन
- पहिल्याच सामन्यात ऋतुराज समोर RCB चे कडवे आव्हान; पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11