आयपीएलचा 17 वा हंगाम हा काही तासांवरती येऊन पोहचला आहे. त्यामुळे चाहत्यांनमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. तर हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याआआधी पासूनच चाहत्याना आतूरता लागून राहिली आहे ती म्हणजे दोन्ही संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. याआधी एमएस धोनीने अचानक कर्णधारपद सोडले असून आता ऋतुराज गायकवाडला चेन्नईचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. याबाबत आयपीएलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे.
OFFICIAL STATEMENT: MS Dhoni hands over captaincy to Ruturaj Gaikwad. #WhistlePodu #Yellove
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2024
याबरोबरच भारताकडून सहा वनडे आणि 19 टी20 सामने खेळलेला ऋतुराज 2020 मध्ये सीएसकेशी जोडला गेला होता. तसेच ऋतुराजने चेन्नईकडून आतापर्यंत 52 सामने खेळला आहे. तर गेल्या वर्षी ऋतुराजने 16 सामन्यात 147 च्या स्ट्राईक रेटने 590 धावा केल्या होत्या. तसेच ऋतुराज गायकवाड हा महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संभाव्य प्लेइंग 11 :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरोन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, अल्झारी जोसेफ, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, आकाश दीप.
चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग 11 :- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली/समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान.
महत्त्वाच्या बातम्या-
- ‘हे’ आहेत धोनी सोडून सीएसकेचे नेतृत्व करणारे खेळाडू, ऋतुराजचा नंबर कितवा?
- संपुर्ण यादी: या ६ मराठमोळ्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये भूषवलेय कर्णधारपद