आयपीएल 2024 शुक्रवारपासून सुरू होत आहे. पण या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने धक्कादायक निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तसेच महेंद्र सिंग धोनीने आपली जबाबदारी आता युवा खेळाडकडे सोपवली आहे. तर महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपरकिंग्सचा नवा कर्णधार असणार आहे.
याबरोबरच, आयपीएल ट्रॉफीसोबत कर्णधाराचे फोटोशूट झाल्यानंतर चाहत्यांना असे समजले होते की, रुतुराज गायकवाड या हंगामात संघाचा कर्णधार असेल, पण काही वेळाने चेन्नई सुपर किंग्स असेही सांगण्यात आले की एमएस धोनीने त्याचे कर्णधारपद रुतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. तसेच एमएस धोनी हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने एकूण पाच आयपीएल विजेतेपदे जिंकले आहेत.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने याआधी 2022 च्या मोसमात कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु संघाच्या खराब कामगिरीमुळे जडेजाने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडले आणि धोनीला पुन्हा कर्णधारपद स्वीकारावे लागले होते. तसेच सुरेश रैनाने देखील आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद भूषवले आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 235 सामने खेळले आहेत. तर यामधील 142 सामने जिंकले असून 90 सामने गमावले आहेत. तर एक सामना बरोबरीत तर 2 अनिर्णित राहिले आहेत.
सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 6 सामने खेळले असून फक्त 2 सामने त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने जिंकले आहेत. तसेच आयपीएल 2022 मध्ये रवींद्र जडेजाची चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी जडेजाच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 8 सामने खेळले होते. यामध्ये 2 सामने हे सीएसकेने जिंकले होते. तसेच या हंगामात सीसीएसकेची कामगिरी देखील खराब झाली होती.
Presenting @ChennaiIPL's Captain – @Ruutu1331 🙌🙌#TATAIPL pic.twitter.com/vt77cWXyBI
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2024
दरम्यान, महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा ऋतुराज गायकवाड हा 2020 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो आहे. तर त्याने आतापर्यंत चार हंगामात 52 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 39.07 च्या सरासरीने आणि 135.52 च्या स्ट्राईक रेटने 1797 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
- संपुर्ण यादी: या ६ मराठमोळ्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये भूषवलेय कर्णधारपद
- BREAKING । थालाच्या चाहत्यांचं हर्टब्रेक! ऋतुराज बनला सीएसकेचा नवा कर्णधार