क्रिकेटटॉप बातम्या

निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत पोहचला, घरी भावनिक स्वागत; पाहा VIDEO

भारताचा महान फिरकी गोलंदाज आर अश्विनने काल (18 डिसेंबर) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी ड्रॉ झाल्यानंतर त्याने ही घोषणा केली. 38 वर्षीय निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन घरी पोहोचला. गुरुवारी चेन्नईत घरी पोहोचल्यावर त्याचे हार्दिक आणि भावनिक स्वागत करण्यात आले. बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी (बीजीटी) च्या मध्यंतरात निवृत्ती घेण्याच्या अश्विनच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. भारताला ऑस्ट्रेलियात अजून दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.

अश्विन घरी पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की अश्विन घरी पोहोचताच त्याठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्याच्या आगमनानंतर बॅण्ड वाजवण्यात आला. तेव्हा अश्विनच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. त्यानंतर त्याच्यावर फुलांचा वर्षाव करत फुलांचा हार घालण्यात आला. अश्विन पहिल्यांदा वडिलांना भेटला. वडिलांनी त्याला मिठी मारली आणि पाठीवर थाप दिली. त्यानंतर तो त्याच्या आईला भेटला. आईने आपल्या मुलाला मिठी मारताच तिचे अश्रू अनावर झाले. अश्विनने काही लोकांना ऑटोग्राफही दिले.

अश्विनच्या घरी पोहोचल्याच्या व्हिडिओवर चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “अश्विन इतका साधा माणूस आहे.” लोकल मॅच खेळून परत आल्यासारखा तो इतक्या प्रेमाने लोकांना भेटला. जमिनीशी जोडून राहण्याची त्यांची सवय यातून दिसून येते

अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलसह क्लब क्रिकेट खेळत राहणार आहे. तो आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळणार आहे. अश्विन हा भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. त्याने 106 कसोटीत 537 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या पुढे माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आहे. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 आणि 65 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 72 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा-

‘अश्विन’ची निवृत्ती ही तर फक्त सुरुवात, आगामी काळात संघात मोठे बदल होणार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियात होणार महत्त्वाचे बदल! अहवालात मोठा खुलासा
अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हता, कारण जो पर्यंत…., टीम मॅनेजमेंट समोर ठेवला होता ‘हा’अट

Related Articles